विरारची जलपरी कृत्तिका वर्तक अव्वल
By admin | Published: August 31, 2016 02:43 AM2016-08-31T02:43:35+5:302016-08-31T02:43:35+5:30
भार्इंदर केशवसृष्टी येथे झालेल सीबीएसई शाळांच्या जलतरण स्पर्धेत विरारच्या वर्तक शाळेतील कृत्तिका वर्तक हिने १४ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
वसई : भार्इंदर केशवसृष्टी येथे झालेल सीबीएसई शाळांच्या जलतरण स्पर्धेत विरारच्या वर्तक शाळेतील कृत्तिका वर्तक हिने १४ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
२०१४ साली पालघर जिल्हा शालेय जलतरण स्पर्धेत १०० मीटरमध्ये सुवर्ण व २०० मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले होते. या स्पर्धांतील कामगिरी पाहून कृत्तिकाला राज्य स्पर्धेत निवड चाचणीत प्रवेश मिळाला होता. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये पालघर जिल्हा जलतरण स्पोर्ट असोसिएशन आयोजित फ्री-स्टाइल स्पर्धेत २०० मीटरमध्ये रौप्य व १०० मीटरमध्ये कांस्य पदक प्राप्त केले होते. वसई कला-क्रीडा महोत्सवातही फ्री-स्टाइल प्रकारात तिने ५० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले होते. २०१५ मध्येही तिने कला-क्रीडा महोत्सवात १०० मीटर फ्री स्टाइल व ५० मीटर बँक स्टोक प्रकारात गोल्ड मेडल मिळवले होते. आहे.
सिंंधूदुर्ग जिल्हा अँक्वेटीक असोसिएशनतर्फे आयोजित पाचव्या राज्यस्तरीय समुद्रीय जलतरण स्पर्धेत तिने २ कि.मी.अंतर ४० मिनीट १५ सेकंदात पार केले होते.
सिंंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्याच सहाव्या महाराष्ट्र राज्य सागरी जलतरण स्पर्धेतही गतवर्षी तीने सहभाग घेतला होता. तिथेही २ कि.मी.अंतर २२.५८ सेकंदात पार करून तीने ९०० स्पर्धकांमधून नववे स्थान पटकावले होते. २०१५ साली स्टारफीश वेलफेअर असोसिएशन कळवा,ठाणे येथे झालेल्या राज्यातील पहिल्या लॉग डिस्टन्स स्विमींग स्पर्धेतही तीने भाग घेतला होता. त्यावेळी १२०० मीटर अंतर कृत्तिकाने २४ मिनीट व १२ सेकंदात पार करून सहावा क्रमांक मिळवला होता. (प्रतिनिधी)