विहिंपचे सुवर्ण महोत्सवी वर्ष : एक लाख हिंदूंच्या उपस्थितीची शक्यता
मुंबई : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 14 डिसेंबरला दुपारी 3 वाजता वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणो आणि कोकण प्रांतातील सुमारे एक लाख हिंदू या संमेलनाला उपस्थिती लावतील, अशी शक्यता विहिंपने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
सुवर्ण जयंतीनिमित्त डिसेंबर 2क्14 ते फेब्रुवारी 2क्15 दरम्यान देशातील पाच महानगरांमध्ये विराट हिंदू संमेलने आयोजित केली जाणार आहेत. त्यातील पहिलेच संमेलन मुंबईत भरणार आहे. या संमेलनात जैन साधू, शीख बांधव व बौद्ध अनुयायीदेखील उपस्थित राहणार असल्याचे विहिंपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांनी सांगितले. आबदेव म्हणाले, की मुंबईव्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता,
बंगळुरू आणि भोपाळ येथे हिंदू संमेलने पार पडणार आहेत. (प्रतिनिधी)
अनधिकृत भोंगे हटवा.. देशातील मशिदींवर असलेले भोंगे अनधिकृत असून, ते हटवावे.ते हटवता येत नसतील तर हिंदूच्या गणोशोत्सव आणि नवरात्र सणांदरम्यानही पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी विहिंपने केली आहे.
कोण कोण राहणार उपस्थित? जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (नाणीज पीठ), योगी आदित्यनाथ महाराज (गोरक्ष पीठ), योगीवर्य नयनपद्मसागर महाराज, भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो, स्वाध्वी सरस्वती, दत्तात्रेय होसबाले, अशोक सिंहल, डॉ. प्रवीण तोगडिया हे संमेलनात उपस्थित राहणार आहेत.