मुंबई : मराठी साहित्य आणि वाचन संस्कृतीशी आजची पिढी दुरावल्याची ओरड कायम होत असते. त्यावर उपाय म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून ई- बुक्स, पीडीएफ आणि अॅपही लाँच करण्यात आले. मात्र काळानुरुप माध्यमांमध्ये आजही स्थित्यंतरे होत आहे, याचाच विचार करुन जागतिक पुस्तक दिनी जुन्या-नव्या दोन्ही पिढींसाठी ‘बुकशेल्फ’ ही केवळ मराठी साहित्य विश्वाला समर्पिलेली यु-ट्युब वाहिनी सुरु करण्यात येत आहे.मराठी साहित्य आणि त्यातील नवी-जुनी पुस्तके या संदर्भातील दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम वाहिनीवरील विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय, आत्मकथन, प्रवासवर्णन,कथा, काव्यसंग्रह, ललितलेखन, माहितीपर लेखन अशा विविध साहित्य प्रकारांवर प्रकाशझोतही या माध्यमातून टाकण्यात येईल. मराठी वाचक वर्ग वाढविण्यासाठी यु-ट्युब हे उत्तम व्यासपीठ आहे. यावर उत्तमोत्तम प्रयोग करण्याची संधीही तरुणाईला खुली आहे. त्यामुळे या प्रमाणेच आणखी प्रयोगशील तरुणाईने यु-ट्युबच्या साथीने मराठी साहित्याचे विश्व आणखी विस्तारावे, असे किरण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.व्हॉट्सअॅपच्या वापरामुळे बऱ्याचदा वपु, पुलं यांच्या शेअर होणाऱ्या पोस्ट्स केवळ ‘कॉपी - पेस्ट’ करणाऱ्या पिढीला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने मराठी साहित्याकडे वळविण्याचा या वाहिनीचा उद्देश आहे. या वाहिनीवर विविध वयोगटातील वाचकांकरिता वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. तसेच, मराठी साहित्यिकाची दीर्घ परंपरा उलगडणारा विशेष कार्यक्रमही यावरुन प्रसारित होईल.- मराठी साहित्य आणि त्यातील नवी-जुनी पुस्तके या संदर्भातील दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम वाहिनीवरील विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय, आत्मकथन, प्रवासवर्णन,कथा, काव्यसंग्रह, ललितलेखन, माहितीपर लेखन अशा विविध साहित्य प्रकारांवर प्रकाशझोतही या माध्यमातून टाकण्यात येईल.गेल्या काही दिवसांत मराठी वेबसिरीज हे नवे माध्यम तरुणाईला आकर्षित करीत आहे. याच धर्तीवर यु-ट्युबवर मराठी साहित्याशी नाळ जोडण्यासाठी काहीतरी करण्याचा मानस होता. बरेच दिवस या वर काम सुरु होते, मात्र आता प्रत्यक्षात ही वाहिनी ‘जागतिक पुस्तक दिनी’ सुरु होतेय, याचा आनंद आहे. भविष्यात वेगळ््या धाटणीच्या आणि तरुणाईला जोडणाऱ्या कार्यक्रम प्रसारित करण्याकडे आमचा कल असणार आहे. - किरण क्षीरसागर, बुकशेल्फ वाहिनी
मराठी साहित्याशी ‘व्हर्च्युअल’ दोस्ती!
By admin | Published: April 23, 2017 3:26 AM