विष्णू सवरा पक्षबांधणी करणार!

By Admin | Published: November 5, 2014 10:38 PM2014-11-05T22:38:55+5:302014-11-05T22:38:55+5:30

पालघर जिल्ह्यातून विक्रमगडचे आ. विष्णु सवरा यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे पालकमंत्रीपदही साहजीकच त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे.

Vishnu Savar will fight for the party! | विष्णू सवरा पक्षबांधणी करणार!

विष्णू सवरा पक्षबांधणी करणार!

googlenewsNext

दीपक मोहिते, वसई
पालघर जिल्ह्यातून विक्रमगडचे आ. विष्णु सवरा यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यामुळे पालकमंत्रीपदही साहजीकच त्यांच्याकडे सोपवले जाणार आहे. ग्रामीण भागातील विविध समस्यांचा अभ्यास असलेले विष्णु सावरा लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रलंबित विकासकामे तसेच प्रस्तावीत विकासकामे याबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अनेकवर्षे आमदारकी व दोनदा मंत्रीपद भुषवणाऱ्या सावरा यांना जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील समस्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे या परिसराचे प्रश्न सोडवताना त्यांना त्रास होण्याची शक्यता कमी आहे.
गेली अनेक वर्षे खा. चिंतामण वनगा व आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा हे दोघेही या जिल्ह्यातील भाजपाची धुरा संयुक्तरित्या सांभाळत आहेत. या दोघांमध्ये चांगला समन्वय असल्यामुळे येणाऱ्या काळात विकासकामे करताना त्यांना अडचणी येण्याची शक्यता कमी आहे. यापुर्वी अनेक प्रश्नी विष्णु सवरा यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. त्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाचे जीवन, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, अन्नधान्य पुरवठा, रोजगार, कुपोषण, आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत योजना इ. चा त्यात समावेश आहे. जिल्ह्णाची निर्मिती होऊन केवळ ३ महिन्याचाच कालावधी झाला असल्यामुळे प्रशासनाची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. दुसरीकडे जिल्हानियोजन समितीचीही स्थापना न झाल्यामुळे विकासकामांना गती मिळू शकलेली नाही. या सर्व आव्हानांना सामोरे जात सावरा यांना जिल्ह्णाचा विकास साधावा
लागणार आहे. तसेच जिल्ह्णात भाजपाची ताकद नगण्य असल्यामुळे पक्षबांधणीकडेही या दोघांना जाणीवपुर्वक लक्ष द्यावे लागणार आहे. प्रशासकीय
कामकाज यशस्वीरित्या पार पाडणे तर दुसरीकडे संघटनेला बळ देणे अशा दोन आघाडीवर या दोघांना
झगडावे लागणार आहे. यामध्ये हे दोघे कितपत यशस्वी होतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Vishnu Savar will fight for the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.