डोंबिवली : सोनसाखळी चोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरीक, महिला, दुकानदार, काही रिक्षावाले व महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना सोसायट्यांच्या गच्चीवर बोलवुन सोनसाखळी चोरीपासून स्वत:ची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यामध्ये येथील एका सामाजिक संस्थेसह विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि त्यांचा ताफा अशी अनोखी शक्कल लढवत आहे. त्या एकत्रिकरणात अशा चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी तोडगा म्हणजे लोकांनी स्वत: सतर्क राहून आपल्या आजूबाजूला जर अशी गोष्ट घडत असेल तर अडवण्याचा प्रयत्न करावा किवा तत्काळ पोलिसांना सूचित करावे असे सांगण्यात आले. हे अभियान सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच चौकाचौकांमध्ये राबण्यात येत आहे. त्यासाठी एक ध्वनिफीत तयार करण्यात आली. या मोहिमेला अधिक बळ मिळावे तसेच प्रत्येक नागरीकांपर्यंत या गोष्टी पोचणे शक्य व्हावे यासाठी पोलीस निरीक्षक निलकंठ पाटील यांच्या सहाय्याने ईगल ब्रिगेडने विष्णूनगर परिसरातील प्रत्येक सोसायटीत जाऊन नागरीकांना सुरक्षिततेबाबत सावधगिरीच्या काही सूचना देण्यात येत असल्याचे बिवलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आता डोंबिवलीत विष्णूनगर पोलिसांची टेरेस मीटिंग!
By admin | Published: December 03, 2014 11:54 PM