मंत्रालयातील गाठीभेटींना आळा-

By admin | Published: April 4, 2015 01:55 AM2015-04-04T01:55:10+5:302015-04-04T01:55:10+5:30

मंत्रालयातील गाठीभेटींना आळा

Visit to the Ministers of the Ministry- | मंत्रालयातील गाठीभेटींना आळा-

मंत्रालयातील गाठीभेटींना आळा-

Next
त्रालयातील गाठीभेटींना आळा
नवा बदल : बदली अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा फायदा
यदु जोशी
मुंबई - बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकाने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणार्‍या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल महिना म्हटला की मंत्र्यांच्या दालनांमध्ये बदल्यांसाठी अधिकार्‍यांची एकच गर्दी दिसते. बदल्यांचे कंत्राट घेऊन फिरणारे दलाल सक्रिय होतात. दरवर्षी दिसणारे हे चित्र यावेळी फारसे दिसत नाही. फडणवीस सरकारने बदल्यांचे विकेंद्रीकरण करत अ वर्ग अधिकार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार हे विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत. ब,क आणि ड वर्ग अधिकारी/कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे अधिकार हे खातेप्रमुखांना देण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकारआदेश् मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि.कुलथे म्हणाले की दरवर्षी मार्च आला की बदल्यांसाठी मंत्रालयातील गाठीभेटी संस्कृतीला आळा घाला असे आवाहन करणारे पत्रक महासंघ काढत असते. यावेळी पहिल्यांदाच तशी वेळ आलेली नाही. काही मोजक्या विभागांमध्ये अजूनही विकेंद्रीकरण झालेले नाही अशी तक्रार आम्ही महासंघाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपण सर्व विभागांना विकेंद्रीकरण करायला सांगू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
--------------------------------
ग्रामविकास विभागात
समुपदेशाने बदल्या
जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी समुपदेशाने बदल्या सुरू केल्या होत्या. तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांना बदली कुठे हवी आहे याचे पर्याय देण्याची मूभा देण्यात आली होती. त्यांच्याशी चर्चा करून बदलीचे ठिकाण निि›त केले जायचे. ही पद्धत ऑनलाईन करण्यात आली होती. सध्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हीच पद्धत कायम ठेवल्याने ग्रामविकासच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आली आहे.

Web Title: Visit to the Ministers of the Ministry-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.