म्हाडामधील व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणाली रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:57 AM2019-07-25T01:57:04+5:302019-07-25T01:57:15+5:30

दलालांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न : जास्त खर्च दाखविल्याने बैठकीत प्रस्ताव नामंजूर

Visitor Management System in Mhada maintained | म्हाडामधील व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणाली रखडली

म्हाडामधील व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणाली रखडली

Next

मुंबई : म्हाडामध्ये येणाऱ्या दलालांवर चाप बसवण्याच्या उद्देशाने म्हाडाने व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणालीचा वापर करण्याचे ठरवले आहे. मात्र प्रस्तावामध्ये जास्त खर्च दाखवण्यात आल्याने म्हाडाच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. मात्र ही प्रणाली गरजेची असून या प्रणालीमुळे म्हाडामध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती जतन होऊ शकते. त्यामुळे कमी खर्चात ही प्रणाली कशी तयार केली जाऊ शकते, यावर काम करून तसा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात येईल, असे म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी संजय कुमार वर्मा यांनी स्पष्ट केले.

व्हिजिटर मॅनेजमेंट प्रणालीबाबत वर्मा म्हणाले की, या प्रणालीमुळे मुख्यालयात प्रवेश करणाºया प्रत्येक व्यक्तीवर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. म्हाडामध्ये गैरप्रकार करणाºयावर अशा यंत्रणेच्या माध्यमातून नक्कीच आळा बसेल. तसेच म्हाडामध्ये विविध कामांसाठी येणाºया नागरिकांची ओळख पटणार आहे. याशिवाय यापूर्वी एकच व्यक्ती किती वेळा आणि कोणत्या विभागामध्ये कामानिमित्त आली आहे याची सर्व नोंद या प्रणालीमध्ये जतन होणार असल्याने दलालांना आळा बसणार आहे.

दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतरही दक्षता आणि सुरक्षा विभागाची किमान यंत्रणा पुरवण्याची गरज पूर्ण झालेली नाही. यामुळे कमीतकमी पैसे खर्च करून यंत्रणा उभारा, असे म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांचे म्हणणे आहे. म्हाडामध्ये दररोज विविध कामांसाठी हजारो नागरिक येत असतात. परंतु वारंवार एकाच विभागात येणारे आणि अनेकांची कामे घेऊन येणारे लोक यांच्यावर आमच्या यंत्रणेतील अधिकारी लक्ष ठेवून आहेत. अनेकवेळा फसवणुकीचे झालेले प्रकार पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे. सध्या मॅन्युअल पद्धतीनेच म्हाडात येणाºया नागरिकांची माहिती घेण्यात येते. आॅनलाइन लॉटरीसारखी म्हाडाच्या सोडतीची प्रक्रिया पारदर्शक असतानाही काही एजंटमार्फत गैरप्रकार करण्यात येत असल्याचे म्हाडा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळेच म्हाडाने असे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष हेल्पलाइन जाहीर केली होती. सध्याच्या कमकुवत असणाºया सुरक्षा आणि दक्षता यंत्रणेत मनुष्यबळ वाढ करणे हे मुख्य उद्दिष्ट म्हाडा प्रशासनाने ठेवले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडे म्हाडाने सुरक्षितता यंत्रणेसाठी मनुष्यबळ वाढीचा तसेच सुरक्षा तंत्रज्ञान विकासाचा प्रस्ताव पाठविला आहे.

ही प्रणाली नेमकी आहे तरी काय?
या प्रणालीअंतर्गत एखादी संस्था किंवा कंपनीत प्रवेश मिळवणाºया व्यक्तीची वैयक्तिक माहिती उदा. नाव, पत्ता, मोबाइल नंबर आदी डेटा एंट्री करण्यात येते. तसेच संबंधित व्यक्तीच्या ओळखपत्राचा तपशीलही घेण्यात येतो. त्या व्यक्तीचा वेब कॅमने फोटो काढून हा सगळा डेटा स्टोअर करण्यात येतो. या प्रणालीअंतर्गत संबंधित व्यक्तीला पावतीही देण्यात येते. त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा कार्यालयात आल्यास ओळख पटवणे शक्य होते.

एजंटचे काढले फोटो
म्हाडाच्या मुख्यालयात वारंवार फिरणारे एजंट रोखण्यासाठी प्रवेशद्वारावरच नोटीस बोर्डावर फोटो लावण्यात आले होते. मात्र फोटोंबाबत काहींनी आक्षेप घेतल्यामुळे हे फोटो तत्काळ काढून टाकण्यात आले आहेत. म्हाडा कार्यालयात येण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, म्हणूनच सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून विविध विभागांत फिरणाऱ्यांवर सुरक्षा रक्षकांचे लक्ष असेल, असेही वर्मा यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Visitor Management System in Mhada maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा