पाहुणे आले मुंबईकरांंच्या भेटीला...

By Admin | Published: January 13, 2015 01:18 AM2015-01-13T01:18:22+5:302015-01-13T01:18:22+5:30

‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे

The visitors came to meet the people of Mumbai ... | पाहुणे आले मुंबईकरांंच्या भेटीला...

पाहुणे आले मुंबईकरांंच्या भेटीला...

googlenewsNext

मनीषा म्हात्रे, मुंबई
‘पंछी नदिया हवा के झोके.. कोई सरहद ना इन्हे रोके..’ या सुप्रसिद्ध हिंदी कवी जावेद अख्तरांच्या ओळी मानवी मनावर किती मार्मिकपणे भाष्य करतात याची प्रचिती मुंबईकरांना येत आहे. निमित्त आहे ते फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या आगमनाचे... दरवर्षीप्रमाणे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी डिसेंबर अखेरीस भांडुप-मुलुंडच्या सीमेवरील पंपिंग स्टेशन, ऐरोली क्रिक ब्रिज, पाम बीच वाशी, ठाणे क्रिक ब्रिज आणि शिवडीच्या खाडीत दाखल झाले आहेत. यामुळे बहुसंंख्य पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांंचे पाय येथे आपसूकपणे वळताना दिसत आहेत.
फ्लेमिंगो या काळात आपल्या उंच पायावर ध्यानस्थ साधुसारखे उभे राहिलेले दिसतात. परंतु खाडीतील पाण्यात ते मासेभेद करण्यासाठी उभे असतात, हे त्यांना निरखून पाहताना कळते. जगात पाच प्रकारच्या फ्लेमिंगोच्या जाती आहेत. यातील ग्रेटर व लेसर या जातीचे फ्लेमिंगो भारतात दरवर्षी येतात. पैकी लेसर प्रजातीचे फ्लेमिंगो कमी प्रमाणात आढळतात. या पक्ष्यांंचे वजन २ ते ३ किलो असून उंंची ८० ते ९० सेमी असते.

Web Title: The visitors came to meet the people of Mumbai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.