‘विस्टाडोम’ उद्यापासून सेवेत, रेल्वे बोर्डाची परवानगी, जनशताब्दीसह धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 02:47 AM2017-09-17T02:47:38+5:302017-09-17T02:47:51+5:30
पारदर्शी बोगी अशी चर्चेत असलेल्या विस्टाडोमला अखेर प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाची परवानगी न मिळाल्यामुळे शनिवारी विस्टाडोम बोगीचा मुहूर्त टळला होता.
मुंबई : पारदर्शी बोगी अशी चर्चेत असलेल्या विस्टाडोमला अखेर प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाची परवानगी न मिळाल्यामुळे शनिवारी विस्टाडोम बोगीचा मुहूर्त टळला होता. परंतु आता बोर्डाची परवानगी मिळाल्यामुळे सोमवारी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससह विस्टाडोम मध्य रेल्वेवर धावणार आहे. दादर ते मडगाव आणि पनवेल ते मडगाव विस्टाडोम प्रवासासाठी प्रवाशांना २ हजार २३५ रुपये मोजावे लागणार आहेत.
जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम ही बोगी जोडण्यात येणार आहे. पर्यटन विशेष आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी विस्टाडोमची निर्मिती करण्यात आली आहे. ही ट्रेन पावसाळी वेळापत्रकानुसार सोडण्यात येईल. दादर स्थानकाहून १८ सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर याकाळात ती उपलब्ध असेल. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी (१२०५१) जनशताब्दीसह आणि मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी (१२०५२) जनशताब्दीसह धावणार आहे.
पावसाळ््यानंतर आठवड्याचे सहा दिवस (बुधवार वगळून) ही बोगी प्रवासासाठी उपलब्ध असेल. फिरणाºया खुर्च्या, पारदर्शी छत, जी. पी. एस यंत्रणा, आॅटोमॅटिक दरवाजे, एलसीडी अशा सर्व आधुनिक सोयी या बोगीत प्रवाशांना पुरवण्यात आल्या आहेत.
स्थानके आणि तिकीट दर
दादर ते पनवेल - ६३० रुपये
दादर ते चिपळूण - १२१५ रुपये
दादर ते रत्नागिरी - १४८० रुपये
दादर ते कणकवली - १८७० रुपये
दादर ते कुडाळ- १९५० रुपये
दादर ते थिविम - २१२० रुपये
दादर ते मडगाव - २२३५रुपये
पनवेल ते चिपळूण- १०७५ रुपये
पनवेल ते रत्नगिरी - ११३० रुपये
पनवेल ते कणकवली - १७५० रुपये
पनवेल ते कुडाव -१८२५ रुपये
पनवेल ते थिविम- १९९५ रुपये
पनवेल ते मडगाव-२२३५ रुपये
- या बोगीचे आरक्षण १७ सप्टेंबरपासून आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे.