मुंबई-पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला जोडणार विस्टाडोम कोच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:11 AM2021-08-08T08:11:37+5:302021-08-08T08:11:49+5:30
पुणे-मुंबई मार्गावरील गाडीला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा मुंबई डेक्कन एक्सप्रेस या विशेष ट्रेनमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता.
मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस या विशेष ट्रेनला १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ८ ऑगस्टपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.
पुणे-मुंबई मार्गावरील गाडीला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा मुंबई डेक्कन एक्सप्रेस या विशेष ट्रेनमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून १७.१० वाजता ही गाडी सुटेल आणि २०.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुण्याहून ०७.१५ वाजता सुटून १०.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. एक व्हिस्टाडोम कोच, ४ वातानुकूलित चेअर कार, ९ सामान्य द्वितीय आसन श्रेणी, २ द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ पॅन्ट्री कार अशी गाडीची रचना आहे.