मुंबई महानगर प्रदेशात २०३१ पर्यंतच्या विकासाचे द्रष्टेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:28 AM2019-09-15T05:28:14+5:302019-09-15T05:28:21+5:30

कोट्यवधी नागरिकांना वास्तव्यासाठी, पोट भरण्यासाठी आपल्या पोटात सामावून घेणारी मुंबई हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर आहे.

Visualization of up to six development in Mumbai Metropolitan Region | मुंबई महानगर प्रदेशात २०३१ पर्यंतच्या विकासाचे द्रष्टेपण

मुंबई महानगर प्रदेशात २०३१ पर्यंतच्या विकासाचे द्रष्टेपण

Next

कोट्यवधी नागरिकांना वास्तव्यासाठी, पोट भरण्यासाठी आपल्या पोटात सामावून घेणारी मुंबई हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. काही दशकांपासून या शहराच्या विकासातील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वाढत्या प्रवासी संख्येमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचे जाळे अपुरे पडत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील भूमी अधिग्रहणाचे प्रश्न, निधीची कमतरता, कायदेशीर प्रश्न, विविध घटकांचे हितसंबंध, बांधकामाचे प्रश्न आदी अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर विविध शासन विभागांचे मूलभूत संरचनेचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
प्रशासकीय यंत्रणेच्या सातत्यपूर्ण नियोजनाच्या प्रयत्नांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळणाचा व्यापक अभ्यास २००५ ते २००८ दरम्यान करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशातील २०३१ पर्यंतच्या वाढीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मेट्रो रेल्वेचे जाळे ४५० किलोमीटरपर्यंत, उपनगरीय रेल्वेचे जाळे २४१ किलोमीटरपर्यंत, तर महामार्गाचे जाळे ५४० किलोमीटरपर्यंत वाढविण्याची शिफारस या अभ्यासात करण्यात आली आहे.
त्याआधारे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने ३३७ किलोमीटरचा ‘मुंबई मेट्रो मास्टर प्लॅन’ तयार केला. त्यापैकी १०५ किलोमीटरच्या टप्प्याचे काम अनेक पातळ्यांवर सध्या सुरू आहे. येत्या ३ ते ४ वर्षांमध्ये या मेट्रो सेवा प्रत्यक्षात सुरू होतील. मेट्रोच्या प्रस्तावित संपर्क जाळ्याचे काम सुरू असताना अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी एखाद्या महानगर प्रशासनाने करण्याची ही भारतातीलच नव्हे, जगातील अनोखी घटना आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
संपूर्ण ३३७ किमी. लांंबीचे मेट्रो जाळे तयार झाल्यानंतर प्रवासाचा लाभ दररोज १ कोटीहून अधिक लोकांनी घेणे अपेक्षित आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटेल. प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल. उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या कमी होईल. तसेच रस्ते वाहतुकीचा वेगही २०३१ पर्यंत ताशी २० किलोमीटरवरून ३६ किलोमीटरपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे. मेट्रो मार्गिका १ चा, वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावरील मेट्रोचा वापर दररोज चार लाखांपेक्षा अधिक प्रवासी करत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अन्य काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. प्रत्येक मेट्रो स्थानक पहिल्या आणि अखेरच्या मैलापर्यंत जोडणे, शहरातील वाहतुकीचा बोजा घटविण्यासाठी पूर्व-पश्चिमेला जोडणारी मुंबई-पारबंदर, १२८ किलोमीटर लांबीचा बहुद्देशीय मार्ग, विविधांगी पूर्व-पश्चिम जोडणी आणि रोप-वे आदींचा त्यात समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास पुढच्या काही वर्षांमध्ये अधिक सुलभ, सुविधापूर्ण, कमीत कमी विलंब लागणारा असणार आहे. त्यासाठी प्रवासीही सहकार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांच्याविषयी प्राधिकरण कृतज्ञ आहे.

Web Title: Visualization of up to six development in Mumbai Metropolitan Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.