मानखुर्द पोटनिवडणुकीत विठ्ठल लोकरे विजयी, निवडणूक प्रत्यक्षात ठरली एकतर्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:25 AM2020-01-11T04:25:26+5:302020-01-11T04:25:34+5:30

मानखुर्द येथील महापालिका प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला.

Vitthal people win in Mankhurd by-election, election becomes one-sided | मानखुर्द पोटनिवडणुकीत विठ्ठल लोकरे विजयी, निवडणूक प्रत्यक्षात ठरली एकतर्फी

मानखुर्द पोटनिवडणुकीत विठ्ठल लोकरे विजयी, निवडणूक प्रत्यक्षात ठरली एकतर्फी

Next

मुंबई : मानखुर्द येथील महापालिका प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला. त्यांनी भाजपचे बबलू पांचाळ यांचा १,३८५ मतांनी पराभव केला. त्यामुळे आता शिवसेनेच्या संख्याबळात एकने वाढ झाली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, समाजवादी यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी ठरली.
काँग्रेसमधून नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन लोकरे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवली. मात्र तिथे पराभव झाल्यामुळे लोकरे यांना शिवसेनेने पोटनिवडणुकीत उभे केले. या एका जागेसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना या पोटनिवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि समाजवादी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र मतदानाच्या दिवशी केवळ ४२ टक्के मतदान झाले.
तर शुक्रवारी सकाळी चार फेऱ्यांत मतमोजणी होऊन अवघ्या एका तासात निकाल जाहीर करण्यात आला. शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांना सर्वाधिक ४,४२७ मते तर भाजपचे बबलू पांचाळ यांना ३,०४२ मते मिळाली. त्यामुळे लोकरे यांना १,३८५ मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. त्याबरोबर शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल-फुले उधळत लोकरे यांचा विजय साजरा केला. या पोटनिवडणुकीत चार राजकीय पक्ष व अपक्ष अशा १४ उमेदवारांना
अपेक्षित मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.
>पक्षीय बलाबल
पक्ष संख्याबळ
शिवसेना - ८५+३(अपक्ष) +६ (मनसेतून आलेले)+ १ = ९५
भाजप - ८१ + १ (अपक्ष) + १ (अभासे) = ८३
काँग्रेस - २८ + १ = २९, राष्ट्रवादी - ०८, समाजवादी - ०६, मनसे - ०१, एमआयएम - ०२
>पक्ष उमेदवार मत
शिवसेना विठ्ठल लोकरे ४४२७
भाजप बबलू पांचाळ ३०४२
अपक्ष खान तुफेल बरकतुल्ला १७८७
समाजवादी खान जमीर भोले १४८६
>प्रभाग क्रमांक १४१ मधून माझा बहुमताने झालेला हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोटीशी भेट
आहे.
- विठ्ठल लोकरे (शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक)

Web Title: Vitthal people win in Mankhurd by-election, election becomes one-sided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.