‘कर्म’च्या उद्घाटनासाठी विवेकचा ट्रेन प्रवास
By admin | Published: March 19, 2017 03:22 AM2017-03-19T03:22:02+5:302017-03-19T03:22:02+5:30
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी केलवे रोडजवळील, बोदन पाडा येथे सुमारे पाच हजार घरांचा ‘कर्म ब्रह्मांड’ गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे.
मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी केलवे रोडजवळील, बोदन पाडा येथे सुमारे पाच हजार घरांचा ‘कर्म ब्रह्मांड’ गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते शनिवारी या गृहप्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वसामन्यांसाठी असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी, विवेकने ‘अंधेरी ते केलवे रोड’ असा टे्रनने प्रवास केला.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाचे स्व: मालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कर्म परिवाराच्या वतीने कर्म ब्रह्मांड या गृहप्रकल्पाची उभारणी करण्यात येत असल्याचे विवेकने सांगितले. तो म्हणाला, ‘केलवे रोड येथील ३५ एकर परिसरात ७ मजली इमारतींचे गृहसंकुल उभारण्यात येणार आहे. कर्म ब्रह्मांडमुळे चार हजार ८०० नागरिकांना बजेटमधील घरांचा लाभ मिळणार आहे. ७ हजार ९०० आणि ५ हजार अशा हप्त्यांवर कर्म ब्रह्मांडमध्ये घराची बुकिंग करता येणार आहे.’
दरम्यान, अंधेरी येथील फलाट क्रमांक आठवरून अहमदाबाद पॅसेंजरने विवेकने केलवे रोडपर्यंत प्रवास केला. केलवे रोड स्थानकावर पोहोचल्यानंतर, तो रिक्षाने कर्म ब्रह्मांड येथे पोहोचला. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी मुंबईकरांची स्थानकांवर झुंबड उडाली होती. विवेकसह सेल्फी घेण्यासाठी तरुण-तरुणींसह प्रवाशांमध्ये चढाओढ सुरू झाली. या वेळी रेल्वे रूळ ओलांडून येणाऱ्या आपल्या चाहत्यांना विवेकने समज दिली. (प्रतिनिधी)
अद्यावत सोईसुविधांनी सुसज्ज ‘ब्रह्मांड’
ग्राहकाभिमुख अत्याधुनिक सोईसुविधांनी सज्ज अशा कर्म ब्रह्मांडमध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालय आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये अन्य गृहप्रकल्पांसारखा नफा न कमावता दर्जेदार गृहप्रकल्प असणार आहे, असा विश्वास विवेकने या वेळी व्यक्त केला.