व्हीजेटीआयची गो-कार्ट सुस्साट!

By admin | Published: February 19, 2015 12:43 AM2015-02-19T00:43:57+5:302015-02-19T00:43:57+5:30

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इकोकार्ट २०१५’ या स्पर्धेत व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

VJTi's Go-Cart Sussex! | व्हीजेटीआयची गो-कार्ट सुस्साट!

व्हीजेटीआयची गो-कार्ट सुस्साट!

Next

श्रीकांत पोटफोडे ल्ल मुंबई
व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी नोएडाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी भरारी घेतली आहे. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘इकोकार्ट २०१५’ या स्पर्धेत व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ‘इकोल्युशन-के01’ ही विजेवर धावणारी गो-कार्ट बनवून या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे.
व्हीजेटीआयच्या ‘मोटरब्रेथ’ या विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली गो-कार्ट बनवली. ही कार्ट पूर्णपर्ण विजेवर चालते. व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयोग होता आणि ते या प्रयोगात यशस्वी ठरले आहेत. या गो-कार्टचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रॅकवर वेगाचे नियंत्रण राखण्यासाठी वेगळे फिचर समाविष्ट आहे. शिवाय ट्रॅकवर कुठेही अडथळा आल्यास त्याची पूर्वसूचना आधीच चालकाला मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच ब्रेकची ऊर्जाबचत गो-कार्टमधील एलईडी लाइट्साठी वापरण्यात येणार आहे. एखाद वेळी गो-कार्टचा अपघात संभवल्यास कार्टला दुखापत होऊ नये, याकरिता कार्टच्या पुढील बाजूस शीतपेयाचे रिकामे टिन्स लावण्यात आले आहेत. या टिन्समुळे कार्टचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल, अशी रचना विद्यार्थ्यांनी केली आहे.
नोएडामधील स्पर्धेत या गो-कार्टला सुरक्षित कार्टचा पुरस्कारही मिळाला. या गो-कार्टची रचना आणि तिचा वापर पडताळण्यासाठी स्पर्धेदरम्यान डोळ्यावर पट्टी बांधून चमूतील एका विद्यार्थ्याने ही गो-कार्ट चालविली. त्या आगळ्यावेगळ्या चाचणीत तो चालक यशस्वी
झाल्याने या चमूला ‘मोस्ट सिंक्रोनाइज्ड’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेत गो-कार्टसाठी कित्येक महिन्यांपासून आमची रात्रंदिवस तयारी सुरू होती. वेगवेगळ्या संकल्पना आणि तरीही इकोफ्रेंडली अशी गो-कार्ट तयार करण्याचे ध्येय आम्ही बाळगले होते़ त्यामुळे विविध कल्पनांवर मेहनत घ्यावी लागली. या संपूर्ण अनुभवात डॉ. एम. व्ही. तेंडोलकर यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले, असे यशस्वी चमूतील आकाश अभानी या विद्यार्थ्याने सांगितले.

गो-कार्टची रचना आणि तिचा वापर पडताळण्यासाठी स्पर्धेदरम्यान डोळ्यावर पट्टी बांधून चमूतील एका विद्यार्थ्याने ही गो-कार्ट चालविली. त्या आगळ्यावेगळ्या चाचणीत तो चालक यशस्वी ठरला.

Web Title: VJTi's Go-Cart Sussex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.