आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची चैत्यभूमीवर घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:06 PM2022-02-14T17:06:56+5:302022-02-14T18:49:43+5:30
काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले.
मुंबई: काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले. काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा
चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या शिळेवर रमाई व्हीविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
मुंबई- चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या शिळेवर रमाई व्हीविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. pic.twitter.com/8NYa54CzCf
— Lokmat (@lokmat) February 14, 2022
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
चैत्यभूमीवर घोषणाबाजी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांना दादर पोलिस स्थानकाच्या चैत्यभूमी पोलीस चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.