फुप्फुसात हवा अडकल्याने आवाज बदलला

By admin | Published: May 1, 2016 02:28 AM2016-05-01T02:28:52+5:302016-05-01T02:28:52+5:30

पनवेल येथे राहणाऱ्या विलासला (२६) अपघात झाल्यामुळे त्याचा आवाज बदलला असून, छातीत हवा अडकली आहे. त्याने श्वास घेतल्यावर फुप्फुस आणि घशात हवा भरली जाते. त्याचा डाव्या बाजूचा

The voice changed due to the lungs in the lungs | फुप्फुसात हवा अडकल्याने आवाज बदलला

फुप्फुसात हवा अडकल्याने आवाज बदलला

Next

मुंबई : पनवेल येथे राहणाऱ्या विलासला (२६) अपघात झाल्यामुळे त्याचा आवाज बदलला असून, छातीत हवा अडकली आहे. त्याने श्वास घेतल्यावर फुप्फुस आणि घशात हवा भरली जाते. त्याचा डाव्या बाजूचा स्वरतंतू पॅरलाईज झाला असल्यामुळे श्वासोच्छ्वास आणि खाण्यासाठी नळी घातल्याचे केईएम रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. नीलम साठे यांनी सांगितले.
पनवेल येथे राहणारा विकास लिफ्टमध्ये असताना अचानक लिफ्ट तुटून त्याच्या छातीला मार बसला. या अपघातानंतर त्याच्या आवाजात बदल झाला आणि छातीत दुखू लागले. यावर उपचार करण्यासाठी १५ दिवसांपूर्वी रात्री २.३०ला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी इंडोस्कोपी करण्यात आली.
इंडोस्कोपीत विलासच्या हृदय आणि फुप्फुसाच्या बाजूला हवा जमा होत असल्याचे निदान झाले. त्यातच त्याची श्वासनलिका फाटली असल्याचेही लक्षात आले. स्वरतंतूच्या नसला जखम झाली आहे. या अवस्थेला वैद्यकीय भाषेत ‘मीडिया स्टिनायटिस’ असे म्हटले जाते. ही अवस्था अधिक काळ राहून गुंतागुंत वाढल्यास जिवावर बेतू शकते. आतली जखम बरी व्हावी यासाठी तिथला भागाची काळजी घेणे आवश्यक आहे. श्वसननलिका फाटली असल्यामुळे अन्न गिळताना त्याला त्रास होत आहे. जर हे असेच होत राहिले तर गुंतागुंत वाढू शकते. विलासची दीड तास तपासणी करण्यात आल्याचे डॉ. साठे यांनी स्पष्ट केले.
जखम बरी व्हावी म्हणून जेवण नळीद्वारे दिले जात आहे. त्याला स्पीच थेरपी दिली जात आहे. यामुळे त्याच्या आवाजात बदल होतो आहे का, हे पाहिले जाणार आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यांनंतर आवाज पूर्ववत झाला नाही, तर त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येईल. जखम बरी व्हावी म्हणून सध्या प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. साठे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: The voice changed due to the lungs in the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.