उत्सवांतील ‘आवाज’ शंभरीपार, गेल्या दोन दिवसांत मर्यादेचे उल्लंघन : आवाज फाउंडेशन :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 03:22 AM2017-09-04T03:22:37+5:302017-09-04T03:22:45+5:30

ध्वनिप्रदूषण समस्या शहरात सातत्याने भेडसावत आहे, त्यामुळे पालिकेने अनेक ठिकाणी ‘शांतता क्षेत्र’ जाहीर केले. मात्र गेल्या दोन दिवसांत शहरात अनेक ठिकाणी आवाज १०० डेसिबलच्या पुढे गेला.

 'Voice' in festive gathering, hundreds of violations in the past two days: Voice Foundation: | उत्सवांतील ‘आवाज’ शंभरीपार, गेल्या दोन दिवसांत मर्यादेचे उल्लंघन : आवाज फाउंडेशन :

उत्सवांतील ‘आवाज’ शंभरीपार, गेल्या दोन दिवसांत मर्यादेचे उल्लंघन : आवाज फाउंडेशन :

googlenewsNext

मुंबई : ध्वनिप्रदूषण समस्या शहरात सातत्याने भेडसावत आहे, त्यामुळे पालिकेने अनेक ठिकाणी ‘शांतता क्षेत्र’ जाहीर केले. मात्र गेल्या दोन दिवसांत शहरात अनेक ठिकाणी आवाज १०० डेसिबलच्या पुढे गेला.
सात दिवसांचे गणपती विसर्जनदरम्यानच्या मिरवणुका आणि बकरी ईदनिमित्त शहरातील मशिदींवरील लाऊडस्पीकर्सच्या आवाजाने डेसिबलचा काटा १०० च्याही पुढे गेल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी नमूद केले. दोन्ही दिवशी अब्दुलाली आणि त्यांचे सहकारी आवाजाचे डेसिबल मोजण्याचे यंत्र हातात घेऊन शहरभर फिरत होते. जवळजवळ सर्वच ठिकाणी डेसिबलचा काटा १०० च्या पुढे जात होता. मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांत हातोडीने घंटा वाजविली जात असल्याने ‘आवाज’ वाढत होता. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सामान्यपणे मनुष्यप्राणी ८० ते ८५ डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title:  'Voice' in festive gathering, hundreds of violations in the past two days: Voice Foundation:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.