मुंबई : बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाला उसंत मिळालेली नाही. मराठीच्या पेपरपाठोपाठ आता शनिवारी सकाळी सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (एसपीचा) पेपर १०.४७ला व्हॉट्सअॅपवर आल्याने एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा बोर्डाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. तांत्रिक पेपरफुटीमुळे बोर्ड पुन्हा एकदा चिंतेत पडले असून, पुढील तपासासाठी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. एसपीची फेरपरीक्षा होणार नसून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे बोर्डाचे मुंबई अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. सकाळी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा ११ वाजता एसपीचा पेपर होता. त्याआधीच म्हणजे १०.४७ मिनिटांनी पेपर व्हॉट्सअॅपवर लीक झाला. विद्यार्थ्यांच्या हातात पेपर येण्याआधी ५ ते ७ मिनिटे पेपर व्हॉट्सअॅपवर लीक होण्याची ही दुसरी घटना आहे. पण, या वेळी विद्यार्थी परीक्षा केंद्रात असतात. परीक्षा केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी आहे. तरीही व्हॉट्सअॅपवर पेपर कसा लीक होतो? याचा शोध बोर्ड घेत आहे. (प्रतिनिधी)
वाणिज्य शाखेचा पेपरही व्हॉट्सअॅपवर
By admin | Published: March 05, 2017 12:52 AM