Join us

‘ऐच्छिक शुल्क घेतल्यास तिकिटे स्वस्त होतील’, डीजीसीएच्या विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:59 AM

दिवसेंदिवस विमान प्रवाशांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे. 

मुंबई : विमान कंपन्यांकडून ग्राहकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या देताना त्यावर ऐच्छिक शुल्क आकारल्यास विमान तिकिटांचे दर आणखी कमी होऊ शकतात, अशी सूचना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना केली आहे. गेल्या काही दिवसांत विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे विमान प्रवाशांच्या संख्येतदेखील विक्रमी वाढ होत आहे. 

त्यानंतर डीजीसीएने विमान कंपन्यांना या सूचना जारी केल्या आहेत. सध्या विमानात चांगली जागा देण्यासाठी पैसे आकारले जातात, विमान प्रवासादरम्यान देण्यात येणारी खान-पान सेवा, लाऊंज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात, प्राधान्याने सामानाचे चेक-इन करण्यासाठी आकारण्यात येणारे पैसे, क्रीडा साहित्याचे वहन, संगीत वाद्यांचे वहन, नाजूक सामानाच्या हाताळणीसाठी अतिरिक्त पैसे आकारणे, असा या सात सेवा असून, त्यावरील पैशांची आकारणी ऐच्छिक करण्याची सूचना केली आहे. यामुळे विमान प्रवासाच्या किमती कमी होऊ शकतात, असे सुचित केले आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळ