स्वेच्छानिधी वाढ व बदलाची नगरसेवकांना प्रतीक्षा
By admin | Published: April 6, 2015 05:20 AM2015-04-06T05:20:39+5:302015-04-06T05:20:39+5:30
राज्य शासनाने पालिकांतील नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छानिधी वापरासाठी २००१ च्या शासन परिपत्रकात प्रस्तावित कामांना मर्यादित केल्याने या कामांच्या
राजू काळे, भार्इंदर
राज्य शासनाने पालिकांतील नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छानिधी वापरासाठी २००१ च्या शासन परिपत्रकात प्रस्तावित कामांना मर्यादित केल्याने या कामांच्या मर्यादेत वाढ तसेच बदल करण्याची प्रतीक्षा प्रशासनासह नगरसेवकांना लागून राहिली आहे.
राज्य शासनाने २६ फेब्रुवारी २००१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नगरसेवक स्वेच्छानिधीतील प्रस्तावित कामांना मर्यादित करण्यात
आले आहे. प्रत्येक पालिका आपल्या हद्दीतील नगरसेवकांसाठी अर्थसंकल्पात स्वेच्छानिधीची तरतूद करीत असते.
त्यानुसार, निधीतील रकमेतून संबंधित नगरसेवक आपापल्या परिसरातील प्रस्तावित कामांच्या यादीतून डास फवारणीकरिता गाड्या खरेदी करणे, दिशादर्शक कमानी, नामफलक बसविणे, रस्ते दुरुस्तीसह फुटपाथ, दुभाजक बांधणे, त्यांचे सुशोभीकरण करणे, वाहतूक नियमांचे पट्टे मारणे, शाळांच्या खोल्या, बसस्थानके, चौक बांधणे, चौकांचे डेकोरेशन, लाइट पोल, सिग्नल यंत्रणा बसविणे, आरोग्यकेंद्र, पोलीस बूथ बांधणे आदी कामांना वगळण्यात आले आहे.