मुंबई : अपुऱ्या पडणाऱ्या अग्निशमन दलाची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवक तयार करण्याचा निर्धार केला आहे़ मात्र, या मोहिमेला नागरिकांडून थंड प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही पुढाकार घेतलेल्या या इच्छुक स्वयंसेवकांना नाराज न करता, त्यांचे प्रशिक्षण रविवारपासून सुरू होत आहे़वाहतूककोंडी आणि अरुंद मार्गामुळे दुर्घटनेच्या ठिकाणी आगीचा बंब पोहोचण्यास विलंब होतो़ काही वेळा हा विलंब नागरिकांच्या जिवावर बेततो़ सुरुवातीच्या गोल्डन अवर्समध्ये मदत न पोहोचल्यास, अनेक निष्पाप जीव धोक्यात येतात़ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी प्राथमिक मदत पोहोचल्यास जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल़ यातूनच नागरिकांना प्रशिक्षित करून स्वयंसेवक तयार करण्याची संकल्पना तयार झाली़ त्यानुसार, अग्निशमन सप्ताहदरम्यानच स्वयंसेवक नोंदणी सुरू झाली़ मात्र, आतापर्यंत केवळ ६८४ स्वयंसेवकांची नोंद झाली आहे़ या स्वयंसेवकांना बोरीवली, मानखुर्द आणि भायखळा या कमांडिंग सेंटर्सवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ हे प्रशिक्षण रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत दिले जाणार आहे़ (प्रतिनिधी)आपली सुरक्षा आपल्या हातीनागरिकांनाच सतर्क व आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे़ त्यानुसार, आपली सुरक्षा आपल्या हाती हा संदेश अग्निशमन दलाने दिला आहे़ मदतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका़ तुमची मदत करण्यास आम्हाला मदत करा, असा संदेश अग्निशमन दलाने या वर्षी दिला आहे़ आपत्ती काळात आपले व आपल्या आप्तेष्टांचे प्राण कसे वाचवता येतील, याचे प्रशिक्षण असल्यास मुंबईत दुर्घटनांमधील बळींची संख्या कमी असेल, असा विश्वास अग्निशमन दलास वाटतो आहे़१८००१२३३४७३ ही अग्निशमन दलाची हेल्पलाइन आहे़
स्वयंसेवकांना आजपासून अग्निसुरक्षेचे धडे
By admin | Published: May 08, 2016 2:42 AM