#Votekar: पंतप्रधानांची साद; 'लोकमत' समूहाला मतदार जागृतीचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 03:00 PM2019-03-25T15:00:49+5:302019-03-25T15:01:31+5:30
देशात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशभरातून यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी 1.9 कोटी नवीन मतदार जोडण्यात आले आहेत.
मुंबई - देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदार नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमेही नेहमीच पुढाकार घेत मतदान जनजागृतीसंदर्भात मोहीम राबवतात. लोकमत वृत्तसमुहाकडूनही मतदारांना प्रेरीत करण्यासाठी, वाचकांना जागृत करण्यासाठी मतदान मोहीम SuperVote Campaigne राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवरुन टॅग करुन @Milokmat माध्यम समुहाने #Votekar कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आहे.
देशात लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशभरातून यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी 1.9 कोटी नवीन मतदार जोडण्यात आले आहेत. यंदा निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. त्यामुळे या नवयुवकांना मतदानासाठी प्रेरित करणे आणि मतदानासाठी खेड्या-पाड्यापर्यंत जनजागृती करण्यासाठी लोकमते सुपर व्होट ही मोहीम यंदा हाती घेतली आहे.
नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यात सतत अग्रेसर असलेल्या नंबर वन लोकमत माध्यम समुहाने #SuperlVote ही मोहिम राबविली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेत मतदारांना आणखी प्रेरित करण्याची प्रेरणा दिली. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना प्रेरित करण्यात वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना मतदान जनजागृतीचे आवाहन केले आहे. MiLokmat माध्यम समुहाचा विशेष उल्लेख करत जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी लोकमत वृत्तसमुहाने मतदारांना प्रेरणा देणाऱ्या नाविण्यपूर्ण मोहिमा राबवाव्यात अशी सूचनाही केली आहे.
दरम्यान, 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 89.7 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 46.5 कोटी पुरुष तर 43.2 कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच 33,109 मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, 16.6 लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे.
लोकशाही राज्यव्यवस्थेत आपलं मत मौल्यवान आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क आणि कर्तव्य जरूर बजावावं, हे लोकमत समूहातर्फे नम्र आवाहन!@PMOIndia@CMOMaharashtra@CEO_Maharashtra@Dev_Fadnavis#LokSabhaElection2019pic.twitter.com/DSCkIcsJA1
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 25, 2019
Participative democracy can be furthered through high voter turnout.
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) March 24, 2019
I urge @MiLOKMAT, @NavbharatTimes and @punjabkesari to increase vote awareness and turnout.
Their doing so would strengthen our polity. #VoteKar