अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह; ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान
By मनोहर कुंभेजकर | Published: November 3, 2022 06:01 PM2022-11-03T18:01:30+5:302022-11-03T18:02:41+5:30
१६६, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान केंद्रावर आज तसा मतदारांमध्ये निरुत्साह दिसला.
मुंबई- १६६, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान केंद्रावर आज तसा मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. सकाळी ११ वाजता ९.७२, ,दुपारी १ वाजता १६.८९, दुपारी ३ वाजता २२.८५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के इतके मतदान झाले आहे.
अंधेरी पूर्व विसनजी अकॅडमी मतदान केंद्रावर १७७,१७७,१९०,१९२,१९५ अशी पाच मतदान बूथ आहे. येथे भेट दिली असता दुपारी १ वाजता शांततेत मतदान सुरू होते. मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी व अधिकारी मार्गदर्शन करत होते. तर येथे चोख पोलिस बंदोबस्त होता.
१७७ मतदान केंद्रावर ९५ नागरिकांनी मतदान केले.,१७८ मतदान बूथ वर १८० नागरिकांनी मटफसन केले.१९० मतदान बूथबर १८७,१९२ मतदान बूथवर २३५,,१९५ मतदान बूथबर ३०० नागरिकांनी मतदान केले.
तर सकाळी ११.३० वाजता व्हिल चेअर बर बसून एक वृद्ध महिला नाकाला ऑक्सिजन,सोबतऑक्सिजन सिलेंडर सह आपल्या मदतनीस व कुटुंबासह १९२ मतदान बूथवर येथे येवून मतदान केले.
अंधेरी पूर्व श्री चिंनाई वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयातील मतदान केंद्रावर असलेल्या क्रीडांगणावर मंडप टाकला आहेत. या मंडपात १७९,१८०,१८१,१८२,१८३,१८७,१८८,१९३,१९४अशी एकूण ९ मतदान बूथ आहेत.येथे शांततेत मतदान सुरू होते.
ऋतुजा रमेश लटके यांनी केले मतदान
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी चिनॉय कॉलेजच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
अंधेरी पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जेष्ठ, अपंग मतदारांना व्हीलचेअर वरून मतदान केंद्रांपर्यंत
जाण्यासाठी शिवसेना उपविभागप्रमूख जितेंद्र जानावळे
यांनी सेवा दिली.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत ज्येष्ठ महिलेला अंधेरी पूर्व, परांजपे मराठी विद्यालय विजयनगर येथील मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत करतांना शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा संघटक नितीन डिचोलकर यांनी सहकार्य केले.
या मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ६८५ असून महिला मतदार १ लाख २४ हजार ८१६, दिव्यांग मतदार : ४१९ तर तृतीय पंथीय मतदार: १ (एक) आहे. तर एकूण मतदार २ लाख ७१ हजार ५०२ आहेत. एकूण मतदान केंद्रे : २५६ असून ही मतदान केंद्रे ३८ ठिकाणी कार्यरत असून २५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्ट ची सुविधा तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील उपलब्ध होती.
सखी मतदान केंद्र :
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्यूकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र क्रमांक ५३ हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रामध्ये एकूण १ हजार ४१८ मतदार असून यापैकी ७२६ महिला; तर उर्वरित ६९२ मतदार हे पुरुष आहेत. या केंद्रातील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले होते. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजविण्यात आलेल्या या मतदान केंद्रामध्ये अधिकारी व कर्मचारी महिला कार्यरत होत्या.
या पोटनिवडणूकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स, मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), नीना खेडेकर (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष), मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष) हे ७ उमेदवार पोटनिवडणूकीच्या रिंगणात आहेत.