मतदार जागृती मोहीम राबवा
By admin | Published: January 2, 2017 06:47 AM2017-01-02T06:47:30+5:302017-01-02T06:47:30+5:30
विविध माध्यमांचा आपापल्या कार्यकक्षेत जास्तीत जास्त उपयोग करून, मतदार जागृती मोहीम राबविण्याची सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केली
मुंबई : विविध माध्यमांचा आपापल्या कार्यकक्षेत जास्तीत जास्त उपयोग करून, मतदार जागृती मोहीम राबविण्याची सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केली. या मोहिमेसाठी विविध प्राधिकरणांना १५ जानेवारीपर्यंत महापालिकेतर्फे प्रचार साहित्य देण्यात येणार असून, महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७मध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत असून, या अनुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या दालनात विविध प्राधिकरणांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निबंधक, जे. जे. स्कूल आॅफ आॅर्ट्स, विविध वाहतूक आस्थापनामध्ये बीएसटी, मध्य व पश्चिम रेल्वेचे क्षेत्रीय रेल प्रबंधक, राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक, परिवहन आयुक्त, आहार आदी प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)