Join us

मोदींकडून मतदारांचा विश्वासघात, काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:14 AM

सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया : काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची टीका

नवी दिल्ली : स्वतंत्र आणि अडथळामुक्त अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासन दिल्यामुळेच पुन्हा निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी केली आहे. सीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडल्यानंतर काही वेळातच सिंघवी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्राप्तीकर विभागाने आपला छळ मांडल्याचे सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते. त्या अनुषंगाने सिंघवी यांनी म्हटले आहे की, ढासळती अर्थव्यवस्था व कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, शेतकºयांच्या आत्महत्या अशा देशासमोरील ज्वलंत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मोदी यांनी पंतप्रधानपदावर पुन्हा विराजमान झाल्यापासून प्रयत्न चालविले आहेत. काश्मीर, पाकिस्तान, मुस्लिम महिला, राम, मॅन व्हर्सेस वाईल्ड, बहुसंख्याकवाद, अल्पसंख्याकवाद या गोष्टींचा ते त्यासाठी आधार घेत आहेत.तपासयंत्रणांनी केला छळ : ममतासीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विविध तपासयंत्रणांकडून होत असलेल्या छळाने ते निराश झाले होते, असा आरोपही त्यांनी केला.निष्पक्ष चौकशी हवी : सिद्धरामय्यासिद्धार्थ यांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करा अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. सिद्धार्थ यांच्या मृत्यूबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तीव्र शोक व्यक्त केलाआहे.सरकार विद्वेषी : विजय मल्ल्याच्बंगळुरू : भारत सरकार विद्वेषी व निर्दयी असल्याची टीका घोटाळेबाज उद्योगपती विजय मल्ल्या याने केली आहे. सीसीडीचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना त्याने केंद्र सरकारविरोधात निशाणा साधला आहे.च्बँकांना गंडा घालून इंग्लंडला पळून गेलेल्या विजय मल्ल्याने एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सिद्धार्थ यांच्याशी मी अप्रत्यक्षपणे जोडला गेलो होतो. ते एक हुशार उद्योजक होते.च्भारतातील यंत्रणा व बँका कोणालाही नैराश्याच्या खाईत ढकलू शकतात. मी सर्व पैशाची परतफेड करण्याची तयारी दाखवूनही मलाही विद्वेषी वागणूक देण्यात येत आहे असा कांगावाही त्याने केला आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीकाँग्रेस