महामुंबईत मतदार वाढले, मतटक्का वाढणार का?; महिला मतदारांची संख्या कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:53 AM2024-04-27T06:53:26+5:302024-04-27T06:54:34+5:30
असे असले तरी मतांचा टक्का वाढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संतोष आंधळे
मुंबई : जनगणना होऊन आता एक तप लोटले आहे. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले. लोकसभा निवडणुकीत तब्बल ९७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावरून मतदारांच्या संख्यावाढीचा अंदाज यावा. महाराष्ट्रात महामुंबई परिसरात मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांत लक्षणीय पद्धतीने वाढली आहे. त्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे अधोरेखित होत आहे. असे असले तरी मतांचा टक्का वाढणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महिलांची मतदार संख्या कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महिला मतदार नोंदणी होत नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. कारण आजही आपल्याकडे राजकारणात महिलांनी मतदार व्हावे यासाठी फार प्रयत्न होत नाही. तसेच लिंग गुणोत्तर प्रमाण व्यस्त आहे.- डॉ. ए.एल. शारदा, सल्लागार, पॉप्युलेशन फर्स्ट
लोकसभा निहाय मतदार संख्या
मतदार संघ पुरुष महिला तृतीयपंथी एकूण
पालघर १०८५२७३ ९८७६५८ २१५ २०७३१४६
भिवंडी १०८९३१२ ९१८५१७ ३३७ २००८१६६
कल्याण १०६५६१२ ९१४३३७ ६९६ १९८०६४५
ठाणे १२९४६५३ ११०८८६१ १९५ २४०३७०९
मुंबई उत्तर ९३५१२९ ८०८३०९ ४०८ १७४३८४६
मुंबई उत्तर-पश्चिम ९१२६९२ ७७०४७० ५७ १६८३२१९
मुंबई उत्तर-पूर्व ८५२३७८ ७३२५५५ २३४ १५८५१६७
मुंबई उत्तर-मध्य ९१७८३० ७७८३३१ ६२ १६९६२२३
मुंबई दक्षिण-मध्य ७७०००६ ६६८८७२ २१८ १४३९०९६
मुंबई दक्षिण ८१५७६५ ६८६२४० ३९ १५०२०४४
रायगड ८१३५१५ ८४०४१६ ४ १६५३९३५