करोडपती उमेदवारांनाच मतदारांची पसंती
By admin | Published: April 28, 2015 12:17 AM2015-04-28T00:17:24+5:302015-04-28T00:17:24+5:30
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या उमेदवारांनाच मतदारांची पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. १११ पैकी तब्बल ७३ जण करोडपती आहेत.
नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या उमेदवारांनाच मतदारांची पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. १११ पैकी तब्बल ७३ जण करोडपती आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २० जणांचा विजय झाला असून, ४६ जण उच्चशिक्षित असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल ५६८ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना सामाजिक कामापेक्षा आर्थिक स्थितीला प्रथम प्राधान्य दिले होते. यामुळेच २०० पेक्षा जास्त उमेदवारांची संपत्ती करोडपेक्षा जास्त होती. मतदारांनीही करोडपती उमेदवारांनाच अधिक प्राधान्य दिले आहे. असोसिएशन आॅफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म (एडीआर) व महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संघटनेने १०५ विजयी उमेदवारांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी ६९ जण करोडपती असल्याचे निदर्शनास आले. ज्या सहा जणांचे सर्वेक्षण झालेले नाही त्यापैकी ४ जण करोडपती असल्यामुळे हा आकडा ७३ झाला आहे. करोडपती उमेदवारांचा दबदबा पाहिल्यानंतर निवडणुकीमध्ये पैशाला महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनात्मक काम, पक्षनिष्ठा, सामाजिक कामांपेक्षाही उमदेवारांकडे प्रचंड पैसे असणे महत्त्वाचे असल्याचा समज निर्माण झाला असून त्यावर या निवडणुकीनेही शिक्कामोर्तब केले आहे. काही अपवादात्मक ठिकाणी मात्र प्रामाणिक व आर्थिक स्थिती सामान्य असलेले उमेदवार निवडून आले आहेत.
पालिका निवडणुकीमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले ५३ जण उभे राहिले होते. त्यांच्यापैकी २० जण निवडून आले आहेत. निवडून आलेल्यांवर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार स्वत: निवडून आलेच शिवाय परिवारातील इतर सदस्यांनाही निवडून आणले आहे. आर्थिक क्षमतेपुढे शैक्षणिक पात्रताही दुय्यम ठरली आहे. उमेदवार निवडताना शिक्षणावर फारसे लक्ष दिले जात नाही. अनेक वेळा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत पक्षाच्या नेत्यांनाही उमेदवाराच्या शिक्षणाची माहिती नसते. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरच अनेकांची शैक्षणिक माहिती समोर येते. (प्र्रतिनिधी)
जिंकलेल्यांपैकी ६५ उमेदवार दहावी त्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेले आहेत. ४६ पदवीधर आहेत. त्यात १ डॉक्टर, ३ अभियते आहेत. ४ जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पाचवीपेक्षा कमी शिक्षण असणारे ७ जण आहेत. ११ जण पाचवी तर १३ जण आठवीपर्यंत शिकले घेतलेले आहेत.
पक्षनिहाय करोडपती
पक्षनगरसेवक
राष्ट्रवादी३१
शिवसेना२९
काँगे्रस६
भाजपा५
अपक्ष२
वयोगटाप्रमाणे तपशील
वयसंख्या
१ ते २४७
२५ ते ३०१४
३१ ते ४०२८
४१ ते ५०४१
५१ ते ६०२०
६१ ते ७०१
शैक्षणिक पात्रता
शिक्षणसंख्या
शिक्षित१
५ वी११
८ वी१३
१०वी२९
१२वी२१
पदवी१६
व्यावसायिक पदवी४
पदव्युत्तर६
डॉक्टर१
इतर३