रेश्मा शिवडेकर/सीमा महांगडे
मुंबई : एका मतदान केंद्रासमोर मतदारांच्या लांबच लांब रांगा... तिथे मतदारांना तीन-तीन तास तिष्ठत रहावे लागत होते. दुसरीकडे अन्य केंद्रात तुरळक मतदार असल्याने त्यांचे अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत मतदान होत होते, अशी दोन विरोधी टोकाची चित्रे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात सोमवारी दिसली. उत्तर मुंबईत महायुतीतर्फे पीयूष गोयल आणि महाविकास आघाडीकडून भूषण पाटील रिंगणात आहेत. सोमवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी अनेक मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी मतदान अत्यंत संथगतीने होत असल्याने बराच वेळ लागत होता. त्यातल्या त्यात काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता खुर्च्यांची सोय केल्याने दिलासा होता. मात्र मतदानासाठी तासनसात रांगेत उभे राहावे लागल्याने मतदार वैतागून गेले होते. त्यात घामाच्या अखंड वाहणाऱ्या धारांनी अनेकांचा जीव नकोसा केला. काही ठिकाणी केंद्रावर बांधण्यात आलेल्या शेडच्या बाहेर रांगा गेल्याने उन्हाचा मारा सहन करत मतदानाचा हक्क बजावावा लागला.मागाठाणे येथील तांबे शाळा, अमरज्योती शाळा, विश्वकर्मा शाळा, स्वामी विवेकानंद, पंचायत समिती शाळा या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवरही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात मतदान अत्यंत संथपणे होत असल्याची मतदारांची तक्रार होती.
विक्रमी रांगमागाठाणे येथील विभूती नारायण शाळेत महिला, पुरुष मतदारांच्या विक्रमी म्हणता येतील इतक्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रांगा रस्त्यावर आल्याने लोकांना उभे राहण्याकरिता इथल्या दुचाकी हटवून जागा करण्यात आली. या ठिकाणी तीन तास मतदार भर उन्हात रांगेत उभे होते. रांगा इतक्या मोठ्या होत्या की सहापर्यंत मतदानाची संधी मिळेल की नाही, याची खात्री मतदारांना नव्हती.
अशोकवनमध्ये मतदान यंत्रात बिघाडरावळपाडा अशोकवन येथील मतदान यंत्रात सकाळीच बिघाड झाला. त्यामुळे येथे काही काळ मतदान थांबवून यंत्र बदलण्यात आले. या केंद्रावर २० मिनिटे वाढवून देण्यात आली.
उन्हाच्या तडाख्यासाठी मिस्ट स्प्रे पंखे भर उन्हात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या काही मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. कांदिवली पूर्वच्या ठाकूर विद्यामंदिर शाळॆत रांगेत उभ्या राहिलेल्या मतदारांसाठी मिस्ट स्प्रे फवारणारे पंखे बसविण्यात आले होते.