विधान परिषदेच्या चार जागांसाठी २५ जूनला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:14 AM2018-05-25T01:14:21+5:302018-05-25T01:14:21+5:30
भाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत
मुंबई : राष्ट्रवादीचे आ. निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अजून खूप लोक रांगेत आहेत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. ते पुन्हा एकदा कोकण पदवीधर मधून विजयी होतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डावखरे यांची उमेदवारीही जाहीर करुन टाकली!
अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना उद्देशून सांगितले. विशेष म्हणजे, डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत आणून सोडण्याचे काम राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी केले. बुधवारीही ते डावखरेंना पत्रकार परिषदेपर्यंत सोडायला गेले होते.
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची साथ सोडून भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. नंदुरबारमधील वजनदार नेते आणि माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी भाजपात प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली, ते विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या हिना गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग पत्करला.राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची साथ सोडून भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. नंदुरबारमधील वजनदार नेते आणि माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी भाजपात प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली, ते विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या हिना गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग पत्करला.