पोटनिवडणुकीसाठी अंधेरीत आज मतदान; ७ उमेदवार रिंगणात, सार्वजनिक सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 06:35 AM2022-11-03T06:35:10+5:302022-11-03T06:35:56+5:30
मुंबई : अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी ही ...
मुंबई : अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात असून २ लाख ७१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.