कोविडबाधित मतदारांना शेवटच्या अर्धा तासात मतदान करता येणार : यू.पी.एस. मदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:05 AM2021-01-14T04:05:42+5:302021-01-14T04:05:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी मार्गदर्शक सूचनाही ...

Vulnerable voters will be able to cast their votes in the last half an hour: UPS Madan | कोविडबाधित मतदारांना शेवटच्या अर्धा तासात मतदान करता येणार : यू.पी.एस. मदान

कोविडबाधित मतदारांना शेवटच्या अर्धा तासात मतदान करता येणार : यू.पी.एस. मदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी मार्गदर्शक सूचनाही राज्य निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. कोरोनाबाधित आणि विलगीकरणातील व्यक्तींनाही मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी मतदान करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी याबाबत सविस्तर पत्रक जारी केले. कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्तींना मतदानाच्या दिवशी शेवटच्या अर्धा तासात प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल. यंदा राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यात सकाळी साडेसात ते दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर, उर्वरित सर्व ठिकाणी सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे.

कोविडबाधित नसलेले; परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. यात त्यांचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त नसल्यास सर्वसाधारण मतदारांप्रमाणे त्यांना मतदान करता येईल. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल.

एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनेही दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचना आधीच देण्यात आल्या आहेत, असे मदान यांनी स्पष्ट केले.

.....................................................

Web Title: Vulnerable voters will be able to cast their votes in the last half an hour: UPS Madan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.