Join us

नुकसानीतल्या २१ मार्गांवरून धावणार व्हीव्हीएमटी

By admin | Published: April 21, 2017 3:25 AM

एसटी महामंडळ वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील ज्या २१ मार्गांवरून एसटीच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत

मुंबई : एसटी महामंडळ वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील ज्या २१ मार्गांवरून एसटीच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत, त्याच मार्गांवरून व्हीव्हीएमटीच्या बसेस चालवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती वसई-विरार महापालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली.आर्थिक तोट्यात असल्याने एसटीने संबंधित २१ मार्गांवरून १ एप्रिलपासून फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला एका सातवीच्या विद्यार्थ्याने व त्याच्या शिक्षिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने एसटीच्या निर्णयाला स्थगिती दिली. तर महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.गुरुवारच्या सुनावणीत पालिकेने एसटीच्या मार्गावर व्हीव्हीएमटी चालवण्याची तयारी दर्शवली. मात्र बसेसच्या पार्किंगची समस्या असल्याचे खंडपीठाला सांगितले. अखेर एसटीलाच त्यांना हवे ते २१ मार्ग निवडू द्या. त्यांच्या निवडीनुसार ते २१ मार्गांवर बससेवा पुरवतील, असे म्हणत न्यायालयाने एसटीला २१ मार्ग व डेपोबाबत ४ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)