वडाळा-कासारवडवली मेट्रो गायमुखपर्यंत- मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:58 AM2018-01-13T01:58:09+5:302018-01-13T01:58:19+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुखपर्यंत (मेट्रो ४ अ) करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील मेट्रोची कामे यावर्षी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

From Wadala-Kasarwadwali Metro Gaemukh - Chief Minister Fadnavis | वडाळा-कासारवडवली मेट्रो गायमुखपर्यंत- मुख्यमंत्री फडणवीस

वडाळा-कासारवडवली मेट्रो गायमुखपर्यंत- मुख्यमंत्री फडणवीस

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुखपर्यंत (मेट्रो ४ अ) करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील मेट्रोची कामे यावर्षी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मेट्रो मार्ग ४ अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे २.७ किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मागार्साठी सुमारे ९४९ कोटी खर्च होईल. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो ४ मार्ग ३२.३ किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग आठवरील वसई व भाईंदर खाडीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश द्यावेत. मेट्रोच्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादकांशी बोलणी करावी. तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

- वडाळा येथे मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. यामुळे रहिवासीबरोबरच वाणिज्यिक व करमणुकीचे केंद्र बनविण्यात येणार आहे. या केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.संत गाडगे महाराज चौक-वडाळ-चेंबूर मोनोरेल मार्गाच्या सुधारित प्रवास भाडेदरास मान्यता देण्यात आली.

Web Title: From Wadala-Kasarwadwali Metro Gaemukh - Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.