वडाळा रेल्वे पोलीस नवीन चौकीच्या प्रतीक्षेत, पोलीस चौकी कोसळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:17 AM2018-12-28T05:17:27+5:302018-12-28T05:17:41+5:30

रेल्वे रुळांच्या अगदी मधोमध असणारी धोकादायक चौकी केव्हाही कोसळेल या भीतीने वडाळा रेल्वे पोलीस चौकीतील अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.

Wadala railway police awaiting new post, police checkpost collapse | वडाळा रेल्वे पोलीस नवीन चौकीच्या प्रतीक्षेत, पोलीस चौकी कोसळण्याच्या स्थितीत

वडाळा रेल्वे पोलीस नवीन चौकीच्या प्रतीक्षेत, पोलीस चौकी कोसळण्याच्या स्थितीत

googlenewsNext

मुंबई : रेल्वे रुळांच्या अगदी मधोमध असणारी धोकादायक चौकी केव्हाही कोसळेल या भीतीने वडाळा रेल्वे पोलीस चौकीतील अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. गेली चार वर्षे वडाळा रेल्वे पोलीस नवीन पोलीस चौकीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेल्वेच्या हद्दीतील सुरक्षेकरिता रेल्वे प्रशासनाने वडाळा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि फलाट क्रमांक ३ च्या अगदी सीएसटीला जाणाऱ्या पटºयांच्या मधोमध दोन हजार साली नवीन चौकी करून दिली होती. या चौकीत १८५ अधिकारी आणि कर्मचारी कामे करतात. मात्र अतिशय धोकादायक परिस्थितीत असलेल्या या चौकीला दोन्ही बाजूंनी जाणाºया लोकलमुळे हादरे बसू लागले. ही चौकी कमकुवत होऊन पडझड सुरू झाली. चौकी धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने ही चौकी धोकादायक ठरवून नवीन पर्यायी जागा देण्याबाबत सूचना जारी केल्या. त्यानुसार रेल्वेच्या मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत फलाट क्रमांक एकवरील मोकळ्या भूखंडावर २०१५ साली बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र त्यांनतर केवळ पायाभरणी करून हे काम थांबविण्यात आले. याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही गेल्या चार वर्षांपासून रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पोलीस अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.
या रेल्वे स्थानकावरून हार्बर, मध्य व पश्चिम रेल्वेच्या गाड्यांची सतत ये-जा सुरू असते़ येथे उतरणाºया प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे़ त्यामुळे येथे पोलीस चौकी आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे़

महिला आणि पुरुषांना एकच शौचालय

पंतप्रधान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी शौचालयाची सुविधा करून देण्यात येते. मात्र या अरुंद अशा चौकीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी केवळ एकच शौचालयाची व्यवस्था आहे. नाइलाजाने या महिला कर्मचाºयांना या शौचालयाचा वापर करावा लागतो.

पावसाळ्यात हाल
प्रत्येक पावसाळ्यात पोलीस ठाण्यात पाणी भरते. येथील सर्व कागदपत्रे भिजतात. बसण्यासाठीसुद्धा कर्मचाºयांसह तक्रारदाराला जागा राहत नाही, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

१३ रेल्वे स्थानकांचा भार
या चौकीवर एकूण १३ रेल्वे स्थानकांचा भार आहे. हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड ते चेंबूर आणि किंग्जसर्कल आणि माहीम रेल्वे स्थानकांपर्यंत या चौकीची हद्द आहे.
अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल या महत्त्वाच्या चौकीतूनच केली जाते. त्यामुळे अरुंद असलेल्या या चौकीत पुष्कळ तक्रारदारांची गर्दी होते.

Web Title: Wadala railway police awaiting new post, police checkpost collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस