Join us

वाधवान बंधूंच्या सीबीआय कोठडीत १ मेपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 6:10 AM

येस बँक घोटाळ्यातील आरोपी व डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान व त्याचा भाऊ धीरज यांच्या सीबीआय कोठडीत विशेष न्यायालयाने १ मे पर्यंत वाढ केली.

मुंबई : येस बँक घोटाळ्यातील आरोपी व डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान व त्याचा भाऊ धीरज यांच्या सीबीआय कोठडीत विशेष न्यायालयाने १ मे पर्यंत वाढ केली.कपिल वाधवान आणि आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचा प्रमोटर धीरज वाधवान यांना २६ एप्रिल रोजी महाबळेश्वर येथून अटक करण्यात आली.येस बँक घोटाळ्याप्रकरणी ७ मार्च रोजी गुन्हा नोंदविल्यापासून त्यांना अटक करेपर्यंत त्या दोघांनीही तपास यंत्रणेला तपासकामी मदत केली नाही, असे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाने १ मे पर्यंत त्यांना सीबीआय कोठडी सुनावली.