Join us

‘वाधवानचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध, तो कुणाला दरमहा पैसे द्यायचा’, संजय राऊतांनी उत्तर द्यावं, मोहित कंबोज यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 3:47 PM

Mohit kamboj : राकेश वाधवानचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत, तो दरमहा कुठल्या नेत्यांना पैसे द्यायचा. राकेश वाधवानचे ५५ लाख रुपये प्रवीण राऊतने तुमच्या पत्नीच्या खात्यात का वळवले, याचं उत्तर द्यावं, असं आव्हान मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना दिले.

मुंबई - भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना पुन्हा डिवचले आहे. संजय राऊत यांच्याकडून झाडण्यात येत असलेल्या आरोपांच्या फैरींना मोहीत कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राकेश वाधवानचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कोणकोणत्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत, तो दरमहा कुठल्या नेत्यांना पैसे द्यायचा. राकेश वाधवानचे ५५ लाख रुपये प्रवीण राऊतने तुमच्या पत्नीच्या खात्यात का वळवले, याचं उत्तर द्यावं, असं आव्हान मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना दिले.

मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की,  संजय राऊतांना माझा प्रश्न आहे. एचडीआयलचे मालक राकेश वाधवानचे कोणकोणत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. २००४ ते १४ या काळात राकेश दीवाण कुठल्या नेत्यांना दरमहा पैसे द्यायचा. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुठल्या कुठल्या नेत्यांना पैसे द्यायाचा. असे कोण कोणते नेते आहेत. त्यांची नावे तुम्ही सांगा नाहीतर आम्ही सांगतो. तुम्ही सोमय्यांवर आरोप करता, पण तुम्हाला प्रश्न विचारल्यावर उत्तर देत नाही. राकेश वाधनावचे ५५ लाख रुपये प्रवीण राऊतन तुच्या पत्नीचया खात्यात का वळवले. गुरुआशिष पंतनगरमध्ये मान्यता मिळवून देण्यात संजय राऊत यांची काय भूमिका होती, या प्रश्नांची उत्तर संजय राऊत यांनी आजच द्यावी.

दरम्यान, आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले होते की, अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची खोटी कथा संजय राऊत यांनीच रचली होती. संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती तोडण्याचं काम संजय राऊत यांनीच केलं. तसेच भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा कायम राहावा यासाठी दररोज सकाळी येऊन बोलणे हे संजय राऊत यांचं राजकारण आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला होता. 

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेना