प्रतीक्षा संपली! उद्यापासून एसी लोकल धावणार, जाणून घ्या तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 12:41 PM2017-12-24T12:41:58+5:302017-12-24T14:13:11+5:30

मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे.

Wait awaited! Run from AC railway from tomorrow, learn ticket rates | प्रतीक्षा संपली! उद्यापासून एसी लोकल धावणार, जाणून घ्या तिकीट दर

प्रतीक्षा संपली! उद्यापासून एसी लोकल धावणार, जाणून घ्या तिकीट दर

Next

मुंबई: मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे.  पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल. त्यानंतर अंधेरी ते विरार नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.  एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे.  भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. 

प्रवास तिकीटदर (अंदाजित)

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.

चर्चगेट ते दादर ९० रु.

चर्चगेट ते वांद्रे ९० रु.

चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.

चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.

चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.

चर्चगेट ते वसई २१० रु.

चर्चगेट ते विरार २२० रु.

गाडीचा वेग : ११० किमी प्रतितास

प्रवासी क्षमता : ५,९६४ आसने : १,०२८

असे आहे वेळापत्रक

एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल. बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.

बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)

चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)

विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)

चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)

विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)

चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)

विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)

चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)

बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)

चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)

विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)


एसी लोकल पाहण्याची संधी

पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत.

Web Title: Wait awaited! Run from AC railway from tomorrow, learn ticket rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.