राणीबागेचे द्वार खुले होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:12+5:302021-02-12T04:07:12+5:30

मुंबई : मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत असल्याने भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे ...

Wait some more time for the gates of Rani Bagh to open | राणीबागेचे द्वार खुले होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा

राणीबागेचे द्वार खुले होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्यात येत असल्याने भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे द्वारही खुले करावे याबाबत उद्यानाच्या संचालकांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना प्रस्ताव पाठविला आहे. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करून एकच आठवडा उलटला असल्याने पालिका सावध पावले टाकत आहे. राणीबागेचे द्वार उघडण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मार्च २०२०पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे राणीची बागही या कालावधीत बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे राणीची बागही खुली करावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. राणी बागेचे द्वार सर्वसामान्यांसाठी उघडल्यानंतरही सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळले जातील, याची खबरदारी घेतली जाणार आहे. याबाबतचा आराखडाही प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने तयार केला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविलेला नाही.

अशी सुरू आहे तयारी....

पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालयात ठरावीक अंतरावर वर्तुळ आखण्यात आले आहे. प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत, तसेच जागोजागी सॅनिटायझर, कचराकुंडी आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राणीबागेत सामान आणण्यास मनाई असेल, तसेच प्राणी-पक्ष्यांच्या कक्षाबाहेरील पूल बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतरही राणीबागेत गर्दी झाल्यास काही वेळेपुरते उद्यानाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.

पाच कोटींचे नुकसान...

राणीबागेत दररोज पाच ते सहा हजार पर्यटक येत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, शनिवारी, रविवारी दहा ते १५ हजार पर्यटक असतात. त्यामुळे पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. मात्र मार्च २०२० पासून आतापर्यंत महापालिकेचे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

राणीबाग सुरू करण्याचा प्रस्ताव सादर झाला आहे. मात्र अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढच्या महिन्यात यावर निर्णय होऊ शकेल.

- इक्बाल सिंह चहल (महापालिका आयुक्त)

Web Title: Wait some more time for the gates of Rani Bagh to open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.