मुंबई : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफाॅर्म विस्ताराच्या कामाला वेग आला असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. फलाट क्रमांक १०, ११, १२, १३, १४ या पाच फलाटांवरून सध्या १२ आणि १८ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावतात, मात्र वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता या फलाटाचा विस्तार २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावण्यासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या फलाटावरील २४ डब्यांच्या रेल्वेगाडीतून प्रवाशांना मार्च २०२४ अखेर प्रवास करणे शक्य होणार आहे.
पूर्ण झालेली कामे... कर्नाक बंदर उड्डाणपूल तोडकाम. रूट रिले इंटरलॉकिंग इमारत बांधकाम.सब स्टेशन इमारत बांधकाम.सीएसएमटी मज्जीद बंदर येथे नियंत्रण कक्ष. रेल्वे मार्गिकांची जोडणी.