अर्जुन रामपालची मंगळवारी पुन्हा चाैकशी, लंडनहून परतण्याची एसीबीला प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:28 AM2020-12-20T06:28:49+5:302020-12-20T06:29:27+5:30
Arjun Rampal : रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याने हजर राहण्यास असमर्थता दर्शविली.
मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा आहे. ताे मुंबईत आल्यानंतर मंगळवार, २२ डिसेंबरला त्याची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
रामपालला चौकशीसासाठी १६ डिसेंबरला एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्याने हजर राहण्यास असमर्थता दर्शविली. वैयक्तिक कारणास्तव ताे परदेशात असल्याचे त्याने वकिलांमार्फत एनसीबीला कळविले.
दीड महिन्यांपूर्वी पथकाने त्याच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकून मोबाइल, लॅपटॉप, टॅब जप्त केले. त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सची सलग दोन दिवस तर रामपालची एकदा स्वतंत्रपणे कसून चाैकशीही करण्यात आली. त्याच्या चालकाकडेही विचारणा केली होती. ग्रॅबिएलाचा भाऊ अंजिलीयसला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आणखी काही माहिती हाती लागल्याने रामपालला चौकशीसाठी समन्स जारी केले.