अवघे दोन आठवडे उरले असताना सन २०१६-१७ चा बेस्ट अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:22 AM2017-09-22T02:22:20+5:302017-09-22T02:22:23+5:30

आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधत असताना आगामी अर्थसंकल्पाच्या रूपाने बेस्ट उपक्रमासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले असताना सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Waiting for approval for the best budget for 2016-17 while remaining for only two weeks | अवघे दोन आठवडे उरले असताना सन २०१६-१७ चा बेस्ट अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

अवघे दोन आठवडे उरले असताना सन २०१६-१७ चा बेस्ट अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधत असताना आगामी अर्थसंकल्पाच्या रूपाने बेस्ट उपक्रमासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले असताना सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
सन २०१६-१७ मध्ये बेस्ट प्रशासनाने ५९० कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला. मात्र गेले आठ महिने हा अर्थसंकल्प महापालिका महासभेपुढे रखडला आहे. दरवर्षी बेस्टचा अर्थसंकल्प १० आॅक्टोबरपर्यंत सादर होणे बंधनकारक आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या आदल्या वर्षीचा अर्थसंकल्प मंजूर केल्याशिवाय नवा अर्थसंकल्पच मांडणे व्यवहार्य नाही.
सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर पालिका महासभेच्या पटलावर पाठविण्यात आला. तूट कितीही असली तरी नियमानुसार अर्थसंकल्प नफ्यात दाखवावा लागतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हा अर्थसंकल्प फेटाळला. यामध्ये बदल करून एक रुपये शिलकीचा अर्थसंकल्प बेस्टने सादर करेपर्यंत यास मंजुरी मिळणार नाही, असे स्पष्ट केल्याने बेस्टच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Waiting for approval for the best budget for 2016-17 while remaining for only two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.