Join us

पालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:44 AM

यंदाही मुदत हुकणार : आचारसंहितेच्या काळात शालेय वस्तुंचा प्रस्ताव रखडला

मुंबई : पालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्यांना यावर्षी लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात शालेय वस्तूचा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तुसाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू वेळेत देण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. तर बऱ्याचवेळा ठेकेदारांनी पुरविलेल्या शालेय वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासली जात असल्याने महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया वस्तूंऐवजी आगामी शैक्षणिक वषार्पासून थेट रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे.

पैसे दिल्यास पालकांकडून खर्च होण्याची शक्यता असते तसेच बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्रे व पैसे विद्यार्थ्यांकडे नसतात, असे शिवसेनेचे मत आहे. पैशांऐवजी वस्तू मिळणारअसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या वस्तू मिळाव्यात यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया रखडली. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी या वस्तू विद्यार्थ्यांना मिळणे अवघड आहे.

पालकांकडे अनुदान जमा करण्यास विरोधपालिका शाळेत शिकणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार तीनशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार होते.विद्यार्थ्यांचे अनुदान त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा करण्यास विरोध होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येणार होते.

यासाठी आधारकार्डची आवश्यकता असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते.

टॅग्स :शाळा