ऐतिहासिक वारसाही विकासाच्या प्रतीक्षेत, सुविधांचा अभाव आणि समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 02:08 AM2017-10-28T02:08:15+5:302017-10-28T02:08:34+5:30

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा रेल्वे स्थानकावर अपुºया सुविधा आहेत. स्थानकात स्वंयचलित जिन्याची कमतरता, गंजलेले पूल, स्थानकांबाहेरील गर्दी, रेल्वे फलाटावर बांधकामाचे साहित्य, अशा अनेक समस्यांनी स्थानकाला ग्रासले आहे.

Waiting for the historical heritage development, the lack of amenities and the challenges facing the area | ऐतिहासिक वारसाही विकासाच्या प्रतीक्षेत, सुविधांचा अभाव आणि समस्यांचे माहेरघर

ऐतिहासिक वारसाही विकासाच्या प्रतीक्षेत, सुविधांचा अभाव आणि समस्यांचे माहेरघर

Next

कुलदीप घायवट 
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा रेल्वे स्थानकावर अपुºया सुविधा आहेत. स्थानकात स्वंयचलित जिन्याची कमतरता, गंजलेले पूल, स्थानकांबाहेरील गर्दी, रेल्वे फलाटावर बांधकामाचे साहित्य, अशा अनेक समस्यांनी स्थानकाला ग्रासले आहे. येथील वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे पडत असून, येथे स्वयंचलित जिने, अपंगांसाठी लिफ्ट नाही, शिवाय पुलांचे काम रखडले आहे. महत्त्वाचे म्हणजे भायखळा रेल्वे स्थानकाला ‘हेरिटेज’चा दर्जा आहे. मात्र भायखळा रेल्वे स्थानकातील सुविधा समाधानकारक नाहीत. परिणामी, या सेवा येथे कधी देणार? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. स्थानकांवर सुविधांची कमतरता असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थानकाची जर अशी अवस्था असेल, तर उर्वरित रेल्वे स्थानकांचा विचार न केलेलाच बरा, अशी खंतही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. येथील नळाला पाणी नाही, तर काही स्टॉल बंद आहेत. सफाई कर्मचाºयांची कमतरता, अपुरे हमाल, दिव्यांचा बंद-चालूचा खेळ, अशा समस्यांनी भायखळा स्थानकाला ग्रासले आहे. स्थानकामध्ये आधुनिक बदल करणे गरजेचे आहे. स्थानकाला रंगकाम करणे, छपरांमध्ये दुरुस्ती करणे, नवीन पुलांची बांधणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानकाला नवीन प्रकारची झळाळी प्राप्त होईल. स्थानकांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
रेल्वे अधिकारी आणि भायखळा स्थानकाच्या आवारातील रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी भायखळा स्थानकाची पाहणी केली. या वेळी अधिकाºयांकडून सांगण्यात आले की, पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत स्थानकांच्या श्रेणीत सुधारणा करू. भायखळा स्थानकात २०१८च्या आधी दोन स्वयंचलित जिने बसविण्यात येणार आहेत. शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १ जवळच्या भागात उद्यान करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
पूर्व-पश्चिम जोडण्यात येणाºया भाजी बाजाराकडील पुलाचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे.
फलाट क्रमांक २ व ३ वर शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे नवीन शौचालयाची उभारणी करावी.
स्वयंचलित जिन्यांची उभारणी करणे, अपंगांसाठी लिफ्ट व रॅम्पची सुविधा करणे गरजेचे आहे.
सफाई कर्मचाºयाची अपुरी संख्या आहे. स्थानकांवर कचरा साचतो. हमाल नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.
>आठवड्यापूर्वी रेल्वे अधिकाºयांची भेट घेत, भायखळा स्थानकाबद्दल नवीन उपाययोजना करण्याबद्दल चर्चा केली. स्थानकाच्या बाहेरील मोकळ्या भागात पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. फलाट क्रमांक ३ वर अस्वच्छता आहे. फलाट क्रमांक १ वरील बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करावा, असे काम सुचविण्यात आले आहे.
- रोहिदास लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा
रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे व संबंधित अधिकाºयांशी बोलून पाठपुरावा करत आहे. पाण्याच्या समस्येवर पाणीविभाग चौकशी करत आहेत. रेल्वे प्रशासनाचे काम धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे कामांना गती देणे गरजेचे आहे. भायखळा स्थानकांवरील प्रवाशांना सोईस्कररीत्या प्रवास कसा करता येईल व मूलभूत सुविधा लवकरात लवकर कशा प्रकारे दिल्या जातील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- वारिस पठाण, आमदार
प्राथमिक सुविधा पुरवाव्यात. गर्दीचे व्यवस्थापन करावे. वेळापत्रकांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- सुशील खैरनार, प्रवासी
नवीन पुलांची उभारणी केल्यावर गर्दीचे नियोजन होईल. पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- आकाश शिंदे, प्रवासी
स्थानकांवर प्रचंड गर्दी असते. सरकारने जागे होत उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
- कुमार गायकवाड, प्रवासी
लोकलमधील लगेज डब्यामध्ये काही वेळा इतर प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे साहित्य ठेवण्यास जागा अपुरी पडते.
- बारकू फफाळे, मुंबईचे डबेवाले
लगेज डब्यामध्ये गर्दीला सामोरे जावे लागते. साहित्य ठेवायला जागा मिळत नाही. प्रशासनाने लगेज डब्यांसाठी सोईसुविधा करणे आवश्यक आहे.
- रघुनाथ कांचे, मुंबईचे डबेवाले
>सूचना, तक्रारी, व्हिडीओ
‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास
८८४७७४१३०१
या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.

Web Title: Waiting for the historical heritage development, the lack of amenities and the challenges facing the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई