हाँटेल, माँल नव्हे प्रार्थनास्थळे उघडण्याची प्रतिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 06:27 PM2020-06-05T18:27:08+5:302020-06-05T18:27:53+5:30

किमान महिनाभर हाँटेलिंग नाही; ३२ टक्के लोकांनी प्रार्थना स्थळांमध्ये जाण्याची आस   

Waiting for hotels, not malls to open places of worship | हाँटेल, माँल नव्हे प्रार्थनास्थळे उघडण्याची प्रतिक्षा

हाँटेल, माँल नव्हे प्रार्थनास्थळे उघडण्याची प्रतिक्षा

Next

 

मुंबई : दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या लाँकडाऊननंतर ‘पुनश्च हरिओम’ म्हणत निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, ही शिथिलता आल्यानंतर पहिल्या महिन्याभरात जेमतेम १० टक्के लोक हाँटेलांमध्ये तर, २१ टक्के लोकच माँलमध्ये शाँपिंगसाठी जातील. मात्र, सर्वाधिक ३२ टक्के लोक हे विविध ठिकाणची प्रार्थनास्थळे उघडण्याची प्रतिक्षेत असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

देशासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. टप्प्याटप्प्याने ही शिथिलता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या संस्थेने देशातील २५४ जिल्ह्यांतील ३२ हजार लोकांचे एक आँनलाईन सर्वेक्षण केले आहे. त्यात हाँटेल, माँल आणि प्रार्थनास्थळांचील प्रवेश सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरात तुम्ही तिथे जाल का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याआधारे वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे हाँटेल आणि माँलमध्ये जाणा-यांचे प्रमाण वाढणार नाही असे हा अहवाल सांगतो. त्यामुळे तिथल्या व्यवसायिकांसमोरील आव्हाने आणखी काही काळ कायम असतील असेच भाकीत वर्तविण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले ६६ टक्के पुरूष तर ३४ टक्के महिलांचा समावेश होता.

 

गेल्या दोन महिन्यांत मानवी जीवन सर्वार्थाने उध्वस्त झाले आहे. आपल्या सर्वांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपल्यापेक्षा समोरच्याचे दु:ख कैक पटीने जास्त आहे हे बघून प्रत्येकाची सहनशीलता वाढत आहे. लाँकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होत असला तरी आरोग्य णि आर्थिक आघाड्यांवरील धोका संपलेला नाही. अशा असहाय्य अवस्थेत मनःशांती आणि संकटाचा मुकाबला करण्यासाठी बळ मिळावे या याचनेसाठी भगवंताच्या चरणी धाव घेण्याची भावना सहाजिक आहे.

-    डाँ. संजय कुमावत, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Waiting for hotels, not malls to open places of worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.