अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांना घोषणेनंतरही मानधनवाढीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:17 AM2018-12-08T05:17:06+5:302018-12-08T05:17:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती.

Waiting for the increase in the honorable staff even after declaration of anganwadi workers | अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांना घोषणेनंतरही मानधनवाढीची प्रतीक्षा

अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांना घोषणेनंतरही मानधनवाढीची प्रतीक्षा

Next

- चेतन ननावरे 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. कारण १ ऑक्टोबरपासून लागू होणारी मानधनवाढ अद्याप मिळाली नसल्याने अंगणवाडी कर्मचा-यांमधून सरकारबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र मोदी अ‍ॅपद्वारे पंतप्रधानांनी अंगणवाडी कर्मचाºयांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. पोषणाची जबाबदारी हाताळण्यात अंगणवाडी कर्मचारी मोलाची कामगिरी बजावत असल्याचेही आवर्जून सांगितले होते. याच संवादात त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ९५० रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनात ७५० रुपये वाढीची घोषणा केली होती. १ आॅक्टोबरपासून ही वाढ पदरात पडेल, असेही ते म्हणाले होते. मात्र, लाल फितीच्या कारभारात वाढ अडकल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.
कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम म्हणाल्या की, शासन स्तरावर केवळ चर्चाच सुरू आहे. पंतप्रधानांच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी दफ्तर दिरंगाई सुरू आहे. मुळात कृती समितीने याहून अधिक मानधनवाढीची मागणी केली 0होती. त्याबाबत अर्थमंत्री स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यातही पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीस इतका विलंब होत असेल, तर महिला व बाल विकास विभाग तसेच वित्त विभाग अंगणवाडी कर्मचाºयांबाबत किती गंभीर आहे, याचा अंदाज बांधता येईल.
>केंद्र सरकारकडून निधी मिळाला नाही - राज्य सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेतील वाढीचा ६० टक्के वाटा हा केंद्र शासन उचलणार आहे. तर महाराष्ट्र शासनाला ४० टक्के वाटा उचलावा लागणार आहे. यानुसार राज्य शासनाच्या तिजोरीवर सुमारे १२५ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र केंद्र शासनाकडून ६० टक्के मानधनवाढीचा निधीच मिळाला नसल्याचे सांगत राज्य शासनाने यासंदर्भातील निर्णय जाहीर केलेला नाही. याउलट निधीची प्रतीक्षा न करता हरयाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली अशा विविध राज्यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केले आहेत.
>राज्यात अंगणवाडी
कर्मचाºयांना मिळणारे मानधन
अंगणवाडी सेविका ६,८२५ ते ७,१६६
मिनी अंगणवाडी सेविका ४,७२५ ते ४,९६१
अंगणवाडी मदतनीस ३,६७५ ते ३,८५९

Web Title: Waiting for the increase in the honorable staff even after declaration of anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.