करंजा टर्मिनलची प्रतीक्षा

By Admin | Published: December 3, 2014 11:09 PM2014-12-03T23:09:07+5:302014-12-03T23:09:07+5:30

स्तावित करंजा टर्मिनल उभारणीच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत.

Waiting for Karanja terminal | करंजा टर्मिनलची प्रतीक्षा

करंजा टर्मिनलची प्रतीक्षा

googlenewsNext

उरण : उरण परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. उद्योग संचालनालय विभागाच्या विकास आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या या एक हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी झाल्याने प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित करंजा टर्मिनल उभारणीच्या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहेत.
उरण तालुक्यातील करंजा परिसरातील आणि चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील ९२ शेतकऱ्यांकडून २१८ एकर जमीन करंजा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावाने खासगी दलालांनी २००८ साली खरेदी करून ठेवली आहे. एकरी ३ लाख ८० हजार रुपये दराने जमिनी खरेदी करताना पाच वर्षात प्रकल्पाची उभारणी करून प्रत्येक शेतकऱ्याच्या वारसांना एकरी तीन नोकऱ्या देण्याचीही हमी कंपनीतर्फे कंपनीचे दलाल किशोर धारिया, जय मेहता, निखिल गांधी यांनी दिली होती.
शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला पूर्णपणे रकमेचा देण्यात आल्याची संख्या फारच कमी आहे.
काही शेतकऱ्यांना १० तर काही शेतकऱ्यांना १० ते ८० टक्के च दरम्यान रकमेचा मोबदला अदा केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या कंपनीच्या वायद्याप्रमाणे रोजगार उपलब्ध होईलच असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रकल्पाच्या उभारणीची प्रतीक्षा शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही लागून राहिली आहे. करंजा खाडीत पाण्याच्या १००० लीटर लांबीचा टर्मिनल उभारण्यात येणार आहे.
भरतीच्या प्रदेशातील ८० हेक्टर परिसरातील हा संपूर्ण प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ हजार डीडब्ल्यूटी क्षमतेइतकी नौका उभारणीच्या कार्गो जेट्टी तयार करण्यात येणार आहे. या कार्गो जेट्टी बंदरात पर्याप्त बोट पार्र्किंगचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ८० हेक्टर प्लॉट क्षेत्रापैकी ७४ हेक्टर क्षेत्र कंटेनर, बल्क, बल्क कार्गो आणि अंतर्गत रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर उर्वरित ६ हेक्टर क्षेत्र बोट पार्र्किंगच्या सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. करंजा खाडीत मल्टीपर्पज टर्मिनल सुविधाही विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे.

Web Title: Waiting for Karanja terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.