Join us

‘लॉ’ निकालाची प्रतीक्षा संपेना

By admin | Published: April 20, 2017 3:04 AM

एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर

मुंबई: एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, नापास झालेले विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणीसाठी पेपर टाकले, पण अद्याप याचा निकाल जाहीर झालेला नाही. येत्या २६ आणि २७ एप्रिलला केटी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान परीक्षा झाली. यानंतर, परीक्षेचा निकाल लागला. त्यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी ५०० रुपये शुल्क भरून पेपर पुर्नतपासणीसाठी पाठविले. पुनर्तपासणीला टाकून ४५ दिवस उलटून गेले आहेत, तरीही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. परीक्षांचे निकाल जाहीर न करता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच केटी परीक्षा जाहीर करण्यात आल्या होत्या, पण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, या परीक्षा पुढे ढकलून २६ आणि २७ एप्रिलला घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. केटी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता, पण आता अवघ्या सहा दिवसांवर केटी परीक्षा आली असूनही पुनर्तपासणीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढला आहे. आता केटी परीक्षेचा अभ्यास करत, पुन्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा. त्यानंतर, पुनर्तपासणीचा निकाल जाहीर झाल्यास काय फायदा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीसाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागते. विद्यार्थ्यांनी हे पैसे भरूनही वेळेवर निकाल न लागल्यास विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.