रेल्वेने केली विशेष ट्रेनसाठी प्रतीक्षा यादीची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:32 PM2020-05-14T18:32:16+5:302020-05-14T18:32:42+5:30
विशेष ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांना आता प्रतीक्षा तिकिट काढता येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने काढले आहे.
मुंबई : रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १५ शहरांसाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांना ‘राजधानी’प्रमाणे फक्त वातानुकूलित डबे असून त्यांचे भाडेही ‘राजधानी’एवढेच आहे. या विशेष ट्रेन सुरु करण्याच्या दुसºयाच दिवशी रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना तिकीटांसाठी प्रतीक्षा यादी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे या विशेष ट्रेनने प्रवास करणाºया प्रवाशांना आता प्रतीक्षा तिकिट काढता येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने काढले आहे.
कोरोनाच्या महामारीत भारतीय रेल्वेने प्रवासी सेवा बंद केली होती. मात्र आता ठप्प असलेली रेल्वेची वाहतुक हळुहळु पुर्वपदावर आणण्यासाठी रेल्वेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार १२ मे पासून काही ठराविक मार्गावर विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या. या गाड्यांना प्रतीक्षा यादीचे तिकिट देण्यात आले नव्हते. मात्र अनेक विशेष गाड्यांमधील सीट रिकाम्या राहिल्यामुळे आणि प्रवाशांनी आपले तिकिट रद्द केल्यामुळे ही सीट वाया जाऊ नये , यातून आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रतीक्षा यादीचे तिकिट देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार २२ मेपासून धावणाºया विशेष गाड्यांचे आरक्षण १५ मे रोजी करता येणार आहे. या गाड्यांना प्रतीक्षा तिकिट देण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांना आरएसी तिकिट नसणार आहे.
------------------------------
क्लास वेटिंग लिस्टची मर्यादा
[प्रथम श्रेणी एसी २०
एक्सुक्युटीव्ह डबे २०
द्वितीय श्रेणी एसी ५०
तृतीय श्रेणी एसी १००
एसी चेअर कार १००
स्लीपर क्लास २००