प्लॅटफॉर्म उंचीसाठी मार्च २0१६ ची प्रतीक्षा

By admin | Published: September 30, 2015 12:45 AM2015-09-30T00:45:00+5:302015-09-30T00:45:00+5:30

लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत असल्याने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून २0१४ मध्ये

Waiting for March 2016 for platform height | प्लॅटफॉर्म उंचीसाठी मार्च २0१६ ची प्रतीक्षा

प्लॅटफॉर्म उंचीसाठी मार्च २0१६ ची प्रतीक्षा

Next

मुंबई : लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत असल्याने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून २0१४ मध्ये सुरू करण्यात आले. एक वर्ष होत आले तरी १४५ प्लॅटफॉर्मपैकी फक्त ४७ प्लॅटफॉर्मची उंचीच वाढवण्यात पश्चिम रेल्वेला यश आले आहे. त्यामुळे उर्वरित प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी मार्च २0१६ ची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागणार असल्याचे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी सांगितले.
जानेवारी २0१४ मध्ये मोनिका मोरेला घाटकोपर स्थानकात झालेल्या अपघातात दोन्ही हात गमवावे लागले. या घटनेनंतर प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तर उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आश्वासन देत साधारण नोव्हेंबर २0१४ पासून त्यावर काम सुरू केले. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर एकूण १४५ प्लॅटफॉर्म आहेत. यातील ४७ प्लॅटफॉर्मची उंची सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार प्रथम या प्लॅटफॉर्मची उंची पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. याबाबत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी. अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत ४७ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली आहे. तर २१ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यावर सध्या काम सुरू असून सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी ३१ मार्च २0१६ ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी यापूर्वी मार्च २0१५ आणि त्यानंतर मे २0१५ अंतिम मुदत होती. आता मात्र हीच मुदत मार्च २0१६ ठेवण्यात आली आहे.
---------
आणखी तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे
लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवरील महिलांच्या एका प्रथम श्रेणी डब्याला स्वयंचलित दरवाजा बसवण्यात आल्यानंतर आणखी तीन डब्यांना हे दरवाजे बसवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. सध्या निधीची कमतरता भासत असून रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच ते काम
हाती घेण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक अग्रवाल यांनी सांगितले.
उपनगरीय स्थानकांवर १८ सरकते जिने
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवरील १८ स्थानकांवर सरकते जिने लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवरील ४२ ट्रेनच्या वेगात वाढ करण्यात आली असून यामध्ये मुंबईतून जाणाऱ्या सात ट्रेनचा समावेश आहे.
राजधानी, शताब्दी तसेच डबल डेकर एक्स्प्रेस ट्रेनच्या विरार-गोधरा आणि विरार-अहमदाबाद विभागात १३0 किमी प्रतितास वाढणार
---------
ट्रेन नंबर १२९५२ नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवास वेळेत २0 मिनिटे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईत ही ट्रेन ८.३५ च्या ऐवजी सव्वाआठ वाजता पोहोचेल. मुंबईत येताच या ट्रेनमुळे मुंबईतील लोकल सेवेला बसणारा फटका कमी होईल, अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Waiting for March 2016 for platform height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.