एक दिवसाच्या बढतीसाठी तब्बल महिनाभराची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:03 AM2020-08-03T06:03:00+5:302020-08-03T06:03:09+5:30
अंमलबजावणीस विलंब; परिवहन विभागातील सावळागोंधळ
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी २९ जून रोजी पदोन्नतीच्या २४ जणांची यादी तयार करण्यात आली. या यादीतील एका अधिकाºयाला ३१ जुलै रोजी म्हणजे सेवानिवृत्तीच्या दिवशी बढती मिळाली. म्हणजे एका दिवसाच्या बढतीसाठी त्यांना तब्बल महिनाभराची प्रतीक्षा करावी लागली.
दिलीप बावीस्कर असे या अधिकाºयाचे नाव आहे. त्यांना धुळे येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३१ जुलै रोजी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर बढती देण्यात आली. मात्र त्याच दिवशी ते सेवानिवृत्त होत असल्याने ही बढती औटघटकेची ठरली. याचप्रकारे जूूनमध्ये दोन अधिकाऱ्यांना एका दिवसासाठी पदोन्नती देण्यात आली होती. कोकण विभागातील मोटार वाहन निरीक्षक अशोक यादव यांची मुंबई पश्चिम विभागात साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून तर पुणे विभागातील मोटार वाहन निरीक्षक रमेश माळवदे यांची सातारा येथे साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाºयांनाही सेवानिवृत्तीच्या दिवशीच पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी केवळ एकच दिवस मिळाला होता.
परिवहन विभागाच्या एका अधिकाºयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, परिवहन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे २४ मोटार वाहन निरीक्षक अधिकाºयांच्या बढतीची यादी तयार करण्यात आली. त्यापैकी दोघांना जूनमध्ये आणि एकाला जुलैमध्ये निवृत्तीच्या तोंडावर बढती मिळाली. आता २१ जणांच्या बढतीचे आदेश कधी निघणार, असा
सवाल अधिकाºयाने विचारला
आहे.
आदेश लवकरच करणार जारी
रखडलेल्या बढत्यांना अर्थकारण कारणीभूत आहे, अशी चर्चा या विभागात दबक्या आवाजात रंगत आहे. तर लवकरच बढती आणि बदलीचे आदेश जारी करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.